श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची सनातनच्या एका संतांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

१. सनातनचे एक संत आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेले सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण

सारणीतील अधोरेखित स्पंदनांचे प्रमाण निराळे येण्याचे कारण

सनातनचे काही सद्गुरु, संत आणि साधक सूक्ष्मातील ज्ञान मिळवतात. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण हे साधकाची पातळी, काळ, सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता इत्यादी घटकांवर अवलंबून असते. साधक, संत आणि सद्गुरु या क्रमानुसार त्यांची सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता वाढत जाते. त्यामुळे साधक, संत आणि सद्गुरु यांनी शोधून काढलेल्या एखाद्या सूक्ष्मातील स्पंदनांच्या टक्केवारीत भेद असू शकतो.

१ अ. गुरुतत्त्व

१ अ १. गुरुतत्त्वाचे कण श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडे प्रवाहित होत असणे : याचे कारण असे की, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आशीर्वाद मिळाला आहे. यामुळे श्रीसत्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सूक्ष्मातील ज्ञान मिळते.

१ अ २. गुरुतत्त्वाचे कणरूपी वलय श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या सहस्राराच्या स्थानी कायमस्वरूपी कार्यरत असणे : ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ध्येय असून हे ध्येय साध्य होण्यासाठी त्यांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे असे आहे.

१ अ ३. गुरुतत्त्वाचे कणरूपी वलय श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आज्ञाचक्रस्थानी कार्यरत असणे : परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सूक्ष्मातून ज्ञान देत असल्याने असे आहे.

१ आ. देवीतत्त्व (तारक)

१ आ १. देवीतत्त्वाचे वलय श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या देहाभोवती असणे : श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यात देवीतत्त्व असून त्या बहुतांश तारक रूपात असतात.

१ इ. तारक शक्ती (या माध्यमातून मिळणारे ईश्वरी ज्ञान)

१ इ १. तारक शक्तीचे वलय श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आज्ञाचक्रस्थानी कार्यरत असणे : याचे कारण असे की, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली यांना ईश्वराकडून ज्ञान मिळत असून या ज्ञानाचा उपयोग त्या अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी करतात.

१ इ २. तारक शक्तीचे कण श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून वातावरणात आणि साधकांकडे प्रक्षेपित होत असणे : श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ साधकांना मार्गदर्शन करत असतांना असे होते.

१ ई. समष्टी भाव 

१ ई १. समष्टी भावाचे वलय श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अनाहतचक्राच्या स्थानी कार्यरत होऊन त्यांच्याकडून वातावरणात आणि साधकांकडे प्रक्षेपित होत असणे : श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील समष्टीप्रती असलेल्या प्रीतीमुळे असे आहे.

१ उ. प्रीती

१ उ १. प्रीतीचे वलय श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अनाहतचक्राच्या स्थानी कार्यरत असणे : प्रीती (निरपेक्ष प्रेम) हा त्यांचा स्थायीभाव असल्याने असे आहे.

१ ऊ. चैतन्य

१ ऊ १. चैतन्याचे वलय श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याभोवती कार्यरत असणे

१ ऊ २. चैतन्याचे वलय श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून व्यापक स्वरूपात वातावरणात प्रक्षेपित होत असणे : त्या जिथे जातात, तिथे त्यांच्यातील चैतन्य वातावरणात प्रक्षेपित होते.

१ ए. आनंद

१ ए १. आनंदाचे वलय श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चेहर्‍याभोवती प्रकाशमान स्वरूपात कार्यरत असणे 

१ ए २. आनंदाचे वलय श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून व्यापक स्वरूपात वातावरणात प्रक्षेपित होत असणे : श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली यांची उच्च आध्यात्मिक पातळी असल्याने असे आहे.

२. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची जाणवलेली अन्य आध्यात्मिक वैशिष्ट्ये

अ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यात अनेक गुण असून त्यांच्यात साधनेतील प्रत्येक टप्प्याला चांगली व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याची क्षमता आहे. त्यामुळे साधकांनाही त्या व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी योग्य मार्गदर्शन करू शकतात.

आ. बहुतांश वेळा त्या तारक रूपात असतात; परंतु कधी कधी ईश्वरेच्छेने आणि साधकांसाठी आवश्यकतेनुसार त्या मारक रूपातही असतात.

इ. त्यांच्यात साधना करण्याची तीव्र तळमळ आहे. त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करून त्यांना अपेक्षित अशी साधना करतात.

ई. ‘सर्वकाही परात्पर गुरु डॉक्टरच करून घेतात’, असा त्यांचा भाव आहे. त्यांच्यातील या भावामुळे त्या अखंड आनंदावस्थेत असतात.

उ. त्या ईश्वर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात असतात. ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ध्येय आहे. या ध्येयाच्या पूर्तीसाठी आवश्यक असे सूक्ष्मातील ज्ञान त्यांना ईश्वर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून मिळते. ‘ईश्वरी राज्याच्या स्थापने’च्या अंतर्गत आवश्यक सूक्ष्मातील पैलूंचा अभ्यास श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ दायित्वाने पहातात.

ऊ. त्या ज्या काही सेवा किंवा साधना करतात, त्या प्रत्येक कृतीतून त्यांना ईश्वरी ज्ञानच मिळते. हे ज्ञान साधकांना त्यांच्या साधनेसाठी मार्गदर्शक असते.

ए. त्यांच्यात साक्षीभाव असून त्या नेहमी स्थिर असतात. त्या कधीच भावनाशील होत नाहीत.

ऐ. त्यांच्यात अत्यल्प अहं असल्यामुळे त्या अतिशय विनम्र आहेत, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी समष्टी साधना होण्यासाठी त्या तळमळीने प्रयत्न करतात.

ओ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ स्मित करतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत प्रीती जाणवते, तसेच त्यांचे स्मित पाहून साधकांनाही आनंद मिळतो.

औ. त्यांच्यात शिकण्याची वृत्ती चांगली असून त्यांच्यातील शरणागतभाव आणि तळमळ यांमुळे त्यांनी स्वतःमध्ये जलद गतीने पालट घडवला आहे.

अं. त्यांना प्रत्येक गोष्टीविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते.

क. साधकांकडून साधनेचे चांगले प्रयत्न झाल्यास अथवा साधकांनी एखाद्या सेवेविषयी चांगला अभ्यास मांडल्यास त्यांना पुष्कळ आनंद होतो. त्या साधकांशी, तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीशी सहिष्णुतेने आणि मनमोकळेपणे बोलतात. त्यांचे हे गुण साधक, तसेच समाजातील लोक यांच्याही लक्षात येतात.’

– सनातनचे एक संत (२१.५.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.