पिंपरी (जिल्हा पुणे) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ जून या दिवशी जगद्गुरु ‘श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिरा’चे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती टिवट्रद्वारे भाजप प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानच्या विश्वस्तांसह आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. देहू संस्थानकडून याविषयी अधिकृत दुजोरा मिळाला असून लवकरच याविषयी पत्रक काढणार असल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले आहे.
देहूगाव येथील देऊळवाड्यातील ‘श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरा’च्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे. या संपूर्ण मंदिराचे पाषाणाद्वारे बांधकाम करण्यात आले आहे.