आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

(भाग ९)

पू. तनुजा ठाकूर

४. श्रम टाळण्यासाठी ‘नॉनस्टिक’ आणि ‘ॲल्युमिनियम’ची भांडी वापरणे

प्रसाद बनवणार्‍या पितळ्याचे भांडे घासण्यासाठी पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे आपण सध्या कर्करोगासह अनेक रोगांना निमंत्रण देणार्‍या ‘नॉनस्टिक’ आणि ‘ॲल्युमिनियम’च्या भांड्यांचा वापर करू लागलो. प्रिय हिंदूंनो, पाश्चात्त्यांची जीवनशैली तमोगुणी आहे. त्यांचा विवेक जागृत नसल्यामुळे त्यांनी शिवत्वहीन विज्ञानाला जन्म दिला; परंतु तुम्ही तर साधना करता, मग तुम्हाला हा भेद लक्षात येत नाही का ? यावर चिंतन अवश्य करावे. आपल्या घरात चिनी मातीपासून बनवलेली भांडी, ‘नॉनस्टिक’ आणि ‘ॲल्युमिनियम’ची असलेली भांडी उचलून बाहेर ठेवून द्या. मगच तुमच्या अन्नपूर्णाकक्षात देवत्व येऊ शकेल. ‘जसे खावे अन्न, तसे रहाते मन’, या सिद्धांतानुसार स्वयंपाक नाही, तर नैवेद्य सिद्ध करा. तो ग्रहण करा आणि हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (८.२.२०२२)