स्वराज्याचा संपूर्ण राज्यकारभार मराठीतूनच चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज !

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !

छत्रपती शिवाजी महाराज

१.‘पेशवा, सुरनीस, सरनौबत, मुजुमदार अशा असंख्य परकीय शब्दांऐवजी पंतप्रधान, सचिव, सेनापती, अमात्य असे मराठी शब्द रूढ होत गेले.

२. मातृभाषा हा राष्ट्राचा प्राण आहे. भाषा म्हणजे राष्ट्राची संजीवनीच !

३. मराठीत प्रचलित झालेले परकीय शब्द : संत ज्ञानेश्वर महाराज समाधीस्त झाले आणि रामराज्य बुडाले, तेव्हापासून मराठी भाषेवर यवनांचे आक्रमण होऊ लागले. इतकेच नव्हे, तर आम्हाला या परकीय नावारूपांचा अभिमान वाटू लागला.

अ. पुढे पुढे आमची नावे आणि आडनावेही पुसली जाऊ लागली. सुलतानराव, रुस्तमराव, हैबतराव, बाजीराव, शहाजी, पिराजी अशी नावे आली.

आ. वैदिक शास्त्री म्हणवून घेणार्‍यांनीही सुलतानभट, होशिंगभट अशी नावे स्वीकारली.

४. शिवसन्निध काळातील ‘मराठी’ पत्र

शिवसन्निध काळातील शाही हुकूमनामे आणि अन्य पत्रव्यवहार वाचले, तर बुद्धी अवाक् होते. उदाहरणार्थ हे ‘मराठी’ पत्र पहा. ‘अजरख्तखाने शहाजीराजे दाम दौलतहु बजाने कारकुनानी व हवालदारांनी हाल व इस्तकबाल …वगैरा वगैरा.’ या पत्रातील काही शब्दच मराठी आहेत. पत्राचे व्याकरण, त्यातील मराठी प्रत्यय, कर्ता, कर्म, क्रियापद सुदैवाने अर्थ समजण्याइतपतच वापरले आहेत; म्हणून या पत्राला मराठी म्हणायचे का ?

– शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

(साभार : ‘कालनिर्णय’ दिनदर्शिका, डिसेंबर २००९)