यवतमाळ, १९ मे (वार्ता.) – शहरातील भोसा परिसरात सकाळी ११.३० सुमारास घरात एकटी असणाऱ्या विवाहितेवर परिचिताकडून अत्याचार करण्यात आला. पाणी पिण्याच्या बहाण्याने आत येऊन गौरव संजय सेलोटकर (वय ३० वर्षे) याने दार बंद करून विवाहितेवर अत्याचार केले.याविषयी सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने बहीण घरी आल्यावर झालेला प्रकार सांगितला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस आरोपीचा शोधघेत आहे.
संपादकीय भूमिकावासनांधतेने गाठलेली परिसीमा ! |