परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गोव्यात विविध उपक्रम
पणजी – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने भारतभरात हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून हिंदु राष्ट्राची स्थापना आणि विश्वकल्याण यांसाठी गोव्यातील विविध मंदिरांमध्ये श्रींच्या चरणी सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले. अनेक ठिकाणी मंदिराच्या पुजाऱ्यांनी श्रींच्या चरणी गऱ्हाणे घातले. या वेळी भक्तगण, देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात येत असलेल्या सत्संगांतील जिज्ञासू उपस्थित होते.
किटल, फातर्पा येथील श्री शांतादुर्गा किटलकरीण मंदिर; आमुर्ली, खोर्ली येथील श्री राष्ट्रोळी देवस्थान; बाणास्तारी येथील श्री महिषासुरमर्दिनी देवस्थान; सावईवेरे, फोंडा येथील श्री अनंत देवस्थान; जुवारवाडा, तिवरे, माशेल येथील श्री महालक्ष्मी देवस्थान; देवळाय, खांडोळा, माशेल येथील श्री सातेरी शांतादुर्गा देवस्थान; माशेल येथील श्री देवकीकृष्ण रवळनाथ देवस्थान; माशेल येथील श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवस्थान; म्हार्दाेळ येथील श्री सातेरी मंदिर; गोठण, वेलींग येथील श्री शांतादुर्गा संस्थान; करमळी (तिसवाडी) येथील श्री कमलादेवी मंदिर; ‘गणेश हिल’, मडकई येथील श्री महागणपति मंदिर; मडकई येथील श्री नवदुर्गा मंदिर; कांतर, उसगाव येथील श्री मारुति मंदिर; तिस्क, उसगाव येथील श्री दत्त मंदिर; मानसवाडा, कुंडई येथील श्री महालक्ष्मी वृंदावन मंदिर; मारुति गड, मळा, पणजी येथील श्री हनुमान मंदिर; भाटले पणजी येथील श्रीराम मंदिर; पर्वरी येथील श्री रामवडेश्वर मंदिर; आल्तिनो, पणजी येथील श्री पिंपळेश्वर मंदिर; म्हार्दाेळ येथील श्री महालसा नारायणी मंदिर; कोठंबी, केपे येथील श्री महादेव मंदिर; डिंगणे, होंडा येथील श्री चिदंबर मंदिर; विर्नाेडा, पेडणे येथील श्री सातेरी मंदिर; मराठावाडा, मांद्रे, पेडणे येथील श्री सिद्धारूढ स्वामी मठ; धारगळ, पेडणे येथील श्री ब्रह्म देवस्थान मंदिर; राय, मडगाव येथील श्री दत्त मंदिर; मडगाव येथील गृहनिर्माण मंडळाचे श्री गजानन महाराज मंदिर; शिरसई येथील श्री गोपालकृष्ण मंदिर; म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर मंदिर; मडगाव येथील श्री राम मंदिर; अडवलपाल येथील श्री गोपाळकृष्ण मंदिर; हळदोणा येथील श्री साईनाथ मंदिर; तीनमाड, कुचेली येथील श्री रामदासस्वामी मठ; नादोडा येथील श्री माऊली मंदिर देवस्थान; काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर; लोलये येथील श्री दामोदर देवस्थान; लोलये, काणकोण येथील श्री दामोदर मंदिर; पैंगीण, काणकोण येथील श्री परशुराम मंदिर आदी ठिकाणी श्रींच्या चरणी साकडे घालण्यात आले.
परशुराम जयंतीच्या निमित्ताने म्हापसा येथील सोमयागी प.पू. सखा हरि आपटे यांच्या पत्नी प.पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजी यांच्या निवासस्थानी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रींच्या चरणी साकडे घालण्यात आले. या वेळी पुरोहित श्री. अविनाश योगी, सोमयाजी प्रकाश आपटे आणि भक्तगण उपस्थित होते.