कागदपत्रे नसल्यास मजार हटवली जाणार !
आगरा (उत्तरप्रदेश) – येथील आगरा कँट रेल्वे स्थानकावर असणार्या बाबा भूरे शाह मजारला बांधकामाच्या मालकी हक्काच्या संदर्भातील कागदपत्रे सादर करण्याची नोटीस प्रशासनाकडून पाठवण्यात आली आहे. १३ मेपर्यंत ही कागपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यानंतर यावर अवैध बांधकाम म्हणून कारवाई करायची कि नाही, यावर निर्णय घेतला जाणार आहे. सध्या मजार व्यवस्था पहाणारे सज्जादा नाशिन यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
अन्य एक नोटीस येथील रेल्वेच्या भूमीवर असणार्या नूरी मशिदीलाही पाठवण्यात आली आहे. मशिदीच्या इमामाला पाठवलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे की, ही मशीद रेल्वेच्या भूमीवर अवैधरित्या बांधण्यात आली असल्याने ही हटवणे आवश्यक आहे. ही मशीद हटवून ती दुसरीकडे स्थानांतरित केली जाणार आहे. (मुळात मशीद अवैध असतांना तिला दुसरीकडे तरी कशाला स्थानांतरित करायचे ? जर प्रशासन असे करणार असेल, तर ज्यांची अवैध घरे आहेत, ते लोकही दुसरीकडे घर देण्याची मागणी करतील. ही एक परंपराच निर्माण होईल की, ‘अवैध घरे बांधा आणि वैध घरे मिळवा !’ – संपादक)
संपादकीय भूमिकाइतकी वर्षे मजार येथे आहे, तर यापूर्वी असा प्रयत्न प्रशासनाने का केला नाही ? ही मजार रेल्वेस्थानकावर बांधण्यात कशी आली ? त्याला उत्तरदायी कोण आहेत ? त्यांचीही माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ! |