उत्तराखंडमध्ये हिंदु महापंचायतीला प्रशासनाने अनुमती नाकारली

काली सेनेचे राज्य संयोजक स्वामी दिनेशांनद भारती यांना अटक

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील डाडा जलालपूर गावामध्ये आयोजित हिंदु महापंचायतीला हरिद्वार जिल्हा प्रशासनाने अनुमती नाकारली आहे. येथे कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आले आहे. या महापंचायतीच्या सिद्धतेसाठी पोचलेले काली सेनेचे राज्य संयोजक स्वामी दिनेशांनद भारती आणि त्यांचे ६ समर्थक यांना पोलिसांनी अटक केली आहे. येथे पंचायतीसाठी लावण्यात आलेले तंबूही पोलिसांनी हटवले आहेत.

१. १६ एप्रिल या दिवशी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर या गावामध्ये धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली होती. ‘या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली नाही’, असा आरोप काली सेनेकडून करण्यात आला होता. त्यासाठी त्यांनी २७ एप्रिल या दिवशी हिंदु महापंचायत आयोजित करण्याची घोषिणा केली होती. त्यानुसार स्वामी दिनेशांनद भारती येथे पोचले होते.

२. प्रशासनाचे म्हणणे आहे की, या महापंचायतीमध्ये प्रक्षोभक भाषणे होण्याच्या शक्यतेने त्याला अनुमती नाकारण्यात आली आहे. त्यानुसारच येथे जमावबंदी लागू करण्यात आली. येथील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होऊ दिला जाणार नाही.

संपादकीय भूमिका

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारे अनुमती नाकारली जाणे हिंदूंना अपेक्षित नाही !