(म्हणे) ‘धर्मासंबंधीचे विचार घरातच ठेवायचे असतात !’ – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

पुणे – धर्मासंबंधी किंवा विचारासंबंधी प्रत्येक व्यक्तीच्या भावना असतात. त्या भावना आणि विचार आपल्या अंत:करणात आणि घरातच ठेवायच्या असतात. आपण आपल्या धार्मिक भावनांचे प्रदर्शन करायला लागलो आणि त्याआधारे अन्य घटकांसंबधी द्वेष पसरवला, तर त्याचे परिणाम समाजावर दिसायला लागतात. महाराष्ट्रात हे कधीही होत नव्हते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राज्यात हनुमान चालिसा पठणावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करावी; पण एकेरी नाव घेऊन टीका करणे योग्य नाही. मुख्यमंत्री ही एक संस्था आहे. अशा संस्थांचा मान कायम ठेवला पाहिजे. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असतांना विधीमंडळात एस्.एम्. जोशी आणि आचार्य अत्रे विरोधी पक्षांचे नेते होते. तेव्हा सभागृहात टोकाची चर्चा होत असे; पण ही चर्चा झाल्यानंतर हे सगळे नेते एकत्र बसून महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घ्यायचे.

संपादकीय भूमिका

  • ‘शरद पवारही जे धर्मविरोधी विचार मांडतात, तेही त्यांनी घरात आणि मनातच ठेवायला पाहिजेत’, असे बहुसंख्य धर्मप्रेमींना वाटते !
  • जेव्हा अन्य धर्मीय रस्त्यावर नमाज पढतात, मशिदींवरील भोंग्यांवरून अजान देऊन समाजाला त्रास देतात, तेव्हा त्यांना कधी पवार यांनी असा सल्ला दिल्याचे ऐकिवात नाही !