नवी देहली – पाकमध्ये अल्पसंख्यांकांना त्रास देणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. पाकिस्तानमधील पहिले शीख पोलीस अधिकारी गुलाब सिंह शाहीन गेल्या ४ वर्षांपासून कुठे आहेत, हे कुणालाही ठाऊक नाही. त्यांना पाकच्या गुप्तचर संघटनांनी अज्ञात जागी नेल्याचे सांगितले जाते. आता ननकाना साहिबमधील शीख नेते आणि ‘पाकिस्तान सिख गुरुद्वारा प्रबंधक कमेटी’चे माजी अध्यक्ष मस्तान सिंह यांच्या कुटुंबावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले.
पाकिस्तान सिख गुरुद्वारा प्रबंधक कमेटी (PSGPC) के पूर्व अध्यक्ष और सिख नेता मस्तान सिंह और उनके परिवार पर ननकाना साहिब में घातक हमला हुआ है।https://t.co/3Yuo4QfyOY
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 21, 2022
मस्तान सिंह यांच्या कुटुंबावर १९ एप्रिलच्या रात्री आक्रमण करण्यात आले. त्यामध्ये त्यांची मुले दिलावर सिंह आणि पाले सिंह गंभीर घायाळ झाले. सिंह यांची तेथे साडेपाच एकर भूमी आहे. ती विकायची त्यांची इच्छा नाही; परंतु स्थानिक मुसलमान आणि प्रशासन त्यांच्यावर गेली १० वर्षे ती विकण्यासाठी दबाव आणत आहेत. भूमाफियांनी ‘इवॅक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड’च्या साहाय्याने काही वर्षांपूर्वीच त्यांच्या भूमीवर नियंत्रण मिळवले असल्याचे मस्तान सिंह यांनी सांगितले. ‘इवॅक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड’ ही सरकारी संघटना भारत-पाकिस्तान विभाजनानंतर बनवण्यात आली होती. तिचा उद्देश भारतात गेलेल्या हिंदू आणि शीख यांची धार्मिक संपत्ती अन् तीर्थक्षेत्र यांचे व्यवस्थापन करायचे होते.
पाकमधील कर्तारपूर कॉरिडोरला जाणार्या भारतीय शिखांना पाककडून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न !
दुसरीकडे पाकमधील शिखांचे तीर्थस्थान असणार्या कर्तारपूर कॉरिडोरला येणार्या भारतीय शीख यात्रेकरूंना पाक त्याच्या जाळ्यात ओढत असल्याचे समोर आले आहे. त्यांचा उपयोग भारतविरोधी कारवाया करण्यासाठी केला जात आहे. भारतीय अधिकारी यासंदर्भात पुरावे गोळा करत आहेत. लवकरच हा विषय राजनैतिक स्तरावर पाकिस्तानच्या समोर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
संपादकीय भूमिकाभारताविरोधी कारवाया करण्यात गुंतलेल्या खलिस्तानवादी संघटना पाकमधील त्यांच्या शीख बांधवांच्या रक्षणासाठी काहीएक करत नाहीत, हे लक्षात घ्या ! यातून त्यांचे शिखांविषयी असलेले बेगडी प्रेम लक्षात येते ! |