हिंदूंनी विरोध केल्यावर उद्दाम उत्तर !
अशा देशद्रोह्यांना आजन्म कारावासात टाकण्याचीच शिक्षा झाली पाहिजे, तरच इतरांवर वचक बसेल !
बरेली (उत्तरप्रदेश) – येथे एक धर्मांध दुकानदार भ्रमणभाषवर गाणे वाजवत असून त्यात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जात असल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. ही घटना मुटावान गावातील असून दुकानदाराचे नाव मुस्तकीन आहे.
#बरेली – जनरल स्टोर पर तेज आवाज में बजाए जा रहे पाकिस्तानी गाने, पाकिस्तान जिंदाबाद के नारे की आवाज का वीडियो हुआ वायरल,भुता थाना क्षेत्र के सिंघाई गांव की घटना. pic.twitter.com/lrb9hLV0sV
— The UP Khabar (@theupkhabar) April 15, 2022
१. मुस्तकीन भ्रमणभाषवर गाणे वाजत असतांना तेथून जाणारे हिंदुत्वनिष्ठ हिमांशू पटेल आणि आशीष पटेल जात होते. गाण्यात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जात असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या गाण्याला विरोध केला. मुस्तकीन याने गाणे बंद करण्याऐवजी ‘मला जे वाटते, ते गाणे मी ऐकणार. याविषयी तुम्हाला कुणाला काही सांगावेसे वाटत असेल, तर त्यांना तुम्ही सांगू शकता’, असे उद्दामपणे सांगितले आणि गाण्याचा आवाज आणखी वाढवला.
बरेली में पाकिस्तान जिंदाबाद के नारे वाला गाना बजाने के आरोप में मुस्तकीम और उसके साथी को पुलिस ने गिरफ्तार किया है।https://t.co/Lj6fOxg9AF
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 15, 2022
२. या घटनेचा व्हिडिओ बनवून हिमांशू पटेल यांनी सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला. तसेच पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस मुस्तकीन याला शोधण्यासाठी गावात गेली असता तो पसार झाला.