सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) आणि दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) सत्संगात उपस्थित असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

१०.१२.२०२१ या दिवशी सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) आणि दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) दैवी बालसाधकांच्या सत्संगात आले असता मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.


पू. भार्गवराम भरत प्रभु
पू. वामन राजंदेकर

१. पू. भार्गवराम प्रभु आणि पू. वामन राजंदेकर सत्संगात येण्यापूर्वी

‘पू. भार्गवराम प्रभु आणि पू. वामन राजंदेकर सत्संगात येण्यापूर्वी सर्व साधक गोलाकार बसले होते. तेव्हा गोलाच्या मध्यभागी मला काही प्रमाणात चैतन्य जाणवत होते आणि अन्य ठिकाणी दाब जाणवत होता.

कु. भाग्यश्री धांडे

२. पू. भार्गवराम प्रभु आणि पू. वामन राजंदेकर यांचे सत्संगात आगमन झाल्यानंतर

२ अ. ‘पू. भार्गवराम आणि पू. वामन यांच्या आगमनानंतर सत्संगातील चैतन्यात वाढ झाली. ‘दोन्ही बालसंतांकडून चैतन्याच्या लहरी प्रक्षेपित होत आहेत’, असे मला वाटले.

२ आ. पू. भार्गवराम करत असलेल्या कृती पाहून ‘ते श्रीकृष्णासमान नटखट आहेत’, असे मला जाणवले.

२ इ. पोटदुखीचा त्रास न्यून होणे : त्या दिवशी सकाळपासून माझ्या पोटात दुखत होते. सत्संग चालू असतांना माझी पोटदुखी न्यून झाली. ‘दोन्ही संतांतील चैतन्यामुळे माझा पोटदुखीचा त्रास न्यून झाला आहे’, असे मला जाणवले.

२ ई. पू. भार्गवराम आणि पू. वामन यांच्याकडे डोळे बंद करून पाहिल्यावर मला नारायणाचे (श्रीविष्णूचे) चरण दिसले. ‘दोघेही श्रीविष्णु आहेत’, असे मला वाटले.

(‘पू. वामन राजंदेकर यांच्या बहिणीला, कु. श्रिया राजंदेकर ((वय १० वर्षे) (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के)) हिला पू. वामन यांना स्पर्श केल्यावर श्रीरामाचा स्पर्श जाणवला आणि पू. भार्गवराम यांना स्पर्श केल्यावर श्रीकृष्णाचा स्पर्श जाणवला. यांतून ‘त्या दोघांमध्ये श्रीविष्णूचे तत्त्व आहे’, हे लक्षात येते.’ – संकलक)

२ उ. ते दोघे लहान असूनही त्यांनी शांतपणे सत्संग ऐकला. सत्संगात अन्य दैवी बालसाधक आणि युवा साधक सूत्रे सांगत असतांना त्या दोघांनीही साधकांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले.

३. सत्संगाच्या समाप्तीनंतर

३ अ. सत्संग झाल्यानंतर साधक बाहेर जात असतांना‘पू. भार्गवराम हे श्रीकृष्ण आणि पू. वामन हे श्रीराम असून त्यांच्या मागे चालत असलेले आम्ही सर्व जण वानरसेना आहोत’, असे मला जाणवले.

मला हे सर्व गुरुदेवांच्या कृपेने अनुभवता आले, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !

– कु. भाग्यश्री रवींद्र धांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक