सत्तेत आलो, तर सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालणार्‍यांकडून दंड वसूल करू !

फ्रान्समधील राष्ट्रपती पदाच्या उमदेवार मरीन ली पेन यांचे आश्‍वासन !

  • फ्रान्स हा जगातील एक प्रगत आणि विज्ञानवादी देश आहे; मात्र त्या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही हिजाबचे सूत्र उपस्थित होते अन् तो घालणार्‍यांकडून दंड वसूल करण्याचे आश्‍वासन दिले जाते. ही भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी आणि विज्ञानवादी यांना चपराकच होय !
  • भारतात कधी निवडणुकीत असे आश्‍वासन कुठलाही राजकीय पक्ष आणि नेता देऊ शकतो का ?

 

पॅरिस (फ्रान्स) – जर सत्तेत आलो, तर सार्वजनिक ठिकाणी हिजाब (मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र) घालणार्‍यांकडून दंड वसूल केला जाईल, असे आश्‍वासन फ्रान्सच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार मरीन ली पेन यांनी दिले आहे. येत्या १० एप्रिलला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा पहिला टप्पा होणार आहे.

फ्रान्समध्ये सध्या सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी आहे. तसेच शाळांमध्ये धार्मिक प्रतीके वापरण्यावरही बंदी आहे. ‘जर असा नियम आणला गेला, तर न्यायालयात त्याला आव्हान देण्यात येईल,’ असे सूत्र उपस्थित करण्यात आल्यावर पेन म्हणाल्या की, यापासून वाचण्यासाठी या विषयावर देशात जनमत संग्रह केला जाईल.