नवी देहली – पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात ८० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसांत ही तेरावी वाढ असून दोन्ही इंधनांमध्ये आतापर्यंत एकूण ९ रुपये २० पैशांची वाढ झाली. ५ एप्रिल या दिवशी झालेल्या वाढीमुळे देहलीत प्रतिलिटरमागे पेट्रोल १०४.६१ रुपये झाले, तर डिझेलचा दर प्रतिलिटर ९५.८७ रुपये झाला आहे. मुंबईत हेच दर अनुक्रमे ११९.६७ रुपये आणि १०३.२८ रुपये झाले.