बांगलादेशमधील फरीदपूर येथे मंदिरातील श्री महादेवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

  • बांगलादेशमधील हिंदू आणि त्यांची श्रद्धास्थाने यांवर सातत्याने होणारी आक्रमणे रोखण्यासाठी भारत बांगलादेशवर आता तरी दबाव आणणार का ? – संपादक
  • भारतात अल्पसंख्यांकांच्या संदर्भात काही घडल्यास हिंदूंना ‘असहिष्णु’ ठरवणारे आता इस्लामी देशांतील अल्पसंख्य हिंदूंच्या दुःस्थितीविषयी काही बोलतील का ? – संपादक

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील फरीदपूर येथील डिकनोगोर गावात ६ मार्च या दिवशी अज्ञातांनी एका हिंदु मंदिरातील श्री महादेवाच्या मूर्तीची तोडफोड केली. हे मंदिर डिकनोगोर येथील रहिवासी गोविंदा साहा यांच्या घराच्या परिसरात आहे .

या घटनेविषयी माहिती देतांना साहा म्हणाले, ‘‘मंदिरातून कसला तरी आवाज येत असल्याचे मला ऐकू आले, त्यामुळे मी घराबाहेर आलो. तेव्हा काही लोक श्री महादेवाच्या मूर्तीची तोडफोड करत असल्याचे मला दिसले. मी तेथे जाताच ते पळून गेले. मी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलीस अधिकारी एम्.ए. जलील यांनी गुन्हेगारांना अटक करण्याचे आश्‍वासन दिले आहे.’’

‘जिल्हा पूजा उत्सव समिती’चे सदस्य संजीव दास यांनी ‘हे घृणास्पद कृत्य असून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे’, असे म्हटले आहे.