मुंबई- अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्या विरोधात आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, असे आताच सांगू शकत नाही. चौकशी अद्याप चालू असल्यामुळे आता कुणालाही ‘क्लिन चिट’ देऊ शकत नाही. अद्याप आमची चौकशी अंतिम टप्प्यात आलेली नाही, अशी माहिती अमली पदार्थविरोधी विभागाच्या (एन्.सी.बी.) विशेष चौकशी समितीचे अधिकारी संजय सिंह यांनी दिली. कार्डेलिया जहाजावर रेव्ह पार्टीत सहभागी झाल्याच्या प्रकरणी अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. अमली पदार्थ बाळगणे आणि सेवन करणे असे त्यांच्यावर आरोप होते; मात्र या प्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाच्या कारवाईवर आरोप-प्रत्यारोप झाल्याने विशेष चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या प्राथमिक पडताळणीत आर्यन खान याच्याकडे कोणतेही अमली पदार्थ नव्हते, असे स्पष्ट झाले आहे. याविषयी काही माध्यमांनी आर्यन खान याला ‘क्लिन चिट’ देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र संपूर्ण चौकशी होऊन कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठी आम्हाला आणखी काही वेळ लागणार आहे, अशी माहिती संजय सिंह यांनी दिली.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > आर्यन खानला अद्याप ‘क्लिन चिट’ नाही ! – एन्.सी.बी.
आर्यन खानला अद्याप ‘क्लिन चिट’ नाही ! – एन्.सी.बी.
नूतन लेख
- बेस्ट बसमधील सूचनांतील व्याकरणाच्या चुका सुधारण्याचा खर्च उत्तरदायींकडून वसूल करा !
- रावसाहेब पाटील जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अशासकीय सदस्य !
- कसबा मतदारसंघात ब्राह्मण उमेदवार हवा ! – अतुल भगरे, ज्योतिषाचार्य
- अमली पदार्थांच्या पडताळणी प्रक्रियेची पूर्तता न केल्याने ८ आरोपींना जामीन
- उंदरांना पकडण्यासाठी गोंदपट्ट्या न वापरण्यासाठी भारतीय प्राणी कल्याण मंडळाकडून याचिका
- महंत रामगिरी महाराजांच्या सरला बेट येथे सुरक्षा वाढवली !