पाकमध्ये पहिल्यांदाच हिंदू बनले लेफ्टनंट कर्नल !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या सैन्यातील दोघा हिंदु अधिकार्‍यांना प्रथमच लेफ्टनंट कर्नल पदावर बढती देण्यात आली आहे. मेजर डॉ. कैलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार अशी या दोन अधिकार्‍यांची नावे आहेत. ‘पाकिस्तान आर्मी प्रमोशन बोर्डा’ने त्यांच्या पदोन्नतीला मान्यता दिल्यानंतर त्यांना ही बढती देण्यात आली. सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यातील रहिवासी असलेले कैलाश कुमार हे वर्ष २०१९ मध्ये हिंदु समुदायातील देशातील पहिले मेजर बनले होते. त्यांचा जन्म वर्ष १९८१ मध्ये झाला आहे. जामशोरो येथील ‘लियाकत युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ अँड सायन्सेस’मधून एम्.बी.बी.एस्. पूर्ण केल्यानंतर वर्ष २००८ मध्ये ते पाकिस्तानी सैन्यात ‘कॅप्टन’ म्हणून रूजू झाले.