भारताविरोधी पाकिस्तानी व्यक्तीचे ट्वीट स्वतः रिट्वीट (पुनर्प्रसारित) केल्यावरून काँग्रेस खासदार शशी थरूर यांना कुवेतमधील भारतीय दूतावासाने फटकारले  !

कर्नाटकातील हिजाब प्रकरण

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची अपकीर्ती करणार्‍या अशा काँग्रेसी नेत्यांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ! – संपादक

काँग्रेस खासदार शशी थरूर (डावीकडे)

कुवेत सिटी (कुवेत) – काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना एका पाकिस्तानी व्यक्तीने केलेले भारतविरोधी ट्वीट स्वतः रिट्वीट (पुनर्प्रसारित) केल्यावरून  येथील भारतीय दूतावासाने फटकारले.

१. पाकिस्तानी व्यक्तीच्या ट्वीटमध्ये म्हटले होते की, शक्तीशाली कुवेतच्या  खासदारांच्या एका गटाने कुवेत सरकारकडे भारतातील सत्ताधारी भाजपच्या कोणत्याही सदस्याला कुवेतमध्ये प्रवेश करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आम्ही मुसलमान मुलींना सार्वजनिक स्तरावर पीडित होतांना पाहू शकत नाही. (इस्लामी देशांत, विशेषतः पाकमध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविषयी का बोलले जाकत नाही ? – संपादक)

२. हे ट्वीट थरूर यांनी ‘रिट्वीट’ करतांना म्हटले की, घरगुती कारवाईचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावरही होत आहे. भारतामध्ये वाढता इस्लामद्वेष आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडून यास न होणारा विरोध यांविषयी आखाती देशांतील मित्रांकडून ऐकतो तेव्हा इतरांशी मैत्री करणे कठीण होते.

३. भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, भारताच्या संसदेच्या एक सदस्याची ही कृती पाहून दुःख वाटते. या सदस्याला भारतविरोधी कारवायांसाठी पाकिस्तानकडून ‘शांतीचा राजदूत’ असा पुरस्कार मिळाला आहे. अशा भारतविरोधी व्यक्तींना प्रोत्साहित केले जाऊ नये.