मुसलमानांची बाजू मांडणारे अधिवक्ता देवदत्त कामत यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका

  • कर्नाटक उच्च न्यायालयात चालू असलेला हिजाबचा खटला

  • अधिवक्ता कामत काँग्रेसचे पदाधिकारी !

अधिवक्ता कामत काँग्रेसचे पदाधिकारी असल्यानेच ते जोरकसपणे मुसलमानांची बाजू मांडत आहेत, हे लक्षात येते ! काँग्रेसमध्ये म. गांधी यांचा उदय झाल्यापासून आतापर्यंत हिच स्थिती कायम आहे ! – संपादक
अधिवक्ता देवदत्त कामत (उजवीकडे)

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील हिजाब प्रकरणाविषयी कर्नाटक उच्च न्यायालयात खटला चालू आहे. यामध्ये मुसलमान विद्यार्थिनींची बाजू अधिवक्ता देवदत्त कामत मांडत आहेत. त्यांनी बाजू मांडतांना ‘कुंकू, टिळा, टिकली, पगडी, क्रॉस यांना अनुमती, तर हिजाबला का बंदी ?’ असा युक्तीवाद केला आहे. यावरून त्यांना सामाजाजिक माध्यमांतून विरोध केला जात आहे. विशेष म्हणजे अधिवक्ता देवदत्त कामत हे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यामुळेच ते मुसलमानांची बाजू जोरकसपणे मांडत असल्याचे म्हटले जात आहे.

अधिवक्ता कामत उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या विधी संदर्भातील समन्वयक समितीचे अध्यक्ष आहेत. कामत काँग्रेसच्या संदर्भातील खटले लढवत असतात. वर्ष २०१८ मध्ये काँग्रेसच्या काही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या प्रकरणाचा खटला ते लढत होते.

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असतांना ते अ‍ॅडिशनल अ‍ॅडव्होकेट जनरलही होते.