भारताकडून इस्लामी देशांच्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ या संघटनेला प्रत्युत्तर !

ओ.आय.सी. संघटना काही स्वार्थी आणि प्रचारक यांच्या अधीन !

नवी देहली – आम्ही ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या (‘ओ.आय.सी.’च्या) महासचिवांचे आणखी एक दिशाभूल करणारे विधान पाहिले आहे.   सचिवालयातून आलेल्या विधानांवरून हे कळत आहे की, ही संघटना काही स्वार्थी आणि प्रचारक यांच्या अधीन आहे. आमच्या देशातील समस्यांचा गांभीर्याने विचार केला जातो आणि आमच्या घटनात्मक चौकटी, तसेच लोकशाही व्यवस्थेनुसार त्यांचे निराकरण केले जाते.

ओ.आय.सी. सचिवालयाची धर्मांध मानसिकता या वास्तविकतेचे योग्य कौतुक करू देत नाही. ओ.आय.सी. केवळ भारताविरुद्ध चुकीच्या भावना पसरवून तिच्या प्रतिष्ठेला हानी पोचवत आहे, अशा शब्दांत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ओ.आय.सी.ला सुनावले आहे. ओ.आय.सी. या इस्लामी देशांच्या संघटनेने भारताने कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून ‘मुसलमानांना आणि महिलांना संरक्षण द्यावे’, अशी मागणी केली आहे. त्यावर भारताने हे प्रत्युत्तर दिले आहे.