कराड, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – तालुक्यातील बाबरमाची येथील रेल्वे बाधित क्षेत्राला रेल्वे प्रशासनाकडून प्रतिगुंठा ५.५ लाख रुपये धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे.
वर्ष २०१८ मध्ये पुणे-मिरज या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विस्तारीकरणाचे काम चालू झाले. या वेळी रेल्वे प्रशासनाने संबंधित क्षेत्रातील शेतकर्यांना विश्वासात न घेता सरळ शेतामध्ये खांब रोवून सीमा निश्चित केल्या आणि काम चालू केले. या विरोधात गत ४ वर्षांपासून शेतकरी नेते सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांनी संघटितपणे लढा दिला. या लढ्याला आता यश आले असून प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते बाबरमाची आणि पंचक्रोशीतील बाधित शेतकर्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.