ट्रांसपरन्सी इंटरनॅशनलच्या ‘भ्रष्टाचार धारणा निर्देशांक २०२१’मध्ये भारत ८५ व्या, तर पाक १४० व्या स्थानावर !

‘ज्या देशाचा क्रमांक जितका खालच्या स्थानावर, तेथे सर्वाधिक भ्रष्टाचार !’, हा संस्थेचा नियम !

भारताला भ्रष्टाचार दूर करण्यात अद्यापही यश आलेले नाही, हेच यावरून लक्षात येते ! भ्रष्टाचार मुळापासून नष्ट करण्यासाठी शासनकर्ते युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची शक्यता नाही. त्यासाठी धर्माचरणी शासनकर्त्यांचे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक

नवी देहली – ट्रांसपरन्सी इंटरनॅशनल संस्थेच्या ‘भ्रष्टाचार धारणा निर्देशांक २०२१’मध्ये गेल्या वर्षभरात १८० देशांमध्ये पाक १४० व्या क्रमांकावर आहे. वर्ष २०२० च्या तुलनेत तो १६ क्रमांकांनी खाली घसरला आहे. दुसरीकडे भारत वर्ष २०२० प्रमाणेच वर्ष २०२१ मध्ये ८५ व्या स्थानावर राहिला आहे. ज्या देशाचा क्रमांक जितका खालच्या स्थानावर आहे तेथे सर्वाधिक भ्रष्टाचार आहे, असे यातून दर्शवण्यात येते.

या निर्देशांकामध्ये भारताला ४० गुण, तर पाकला २८ गुण मिळाले आहेत. ८८ गुण मिळवून डेन्मार्क, फिनलंड आणि न्यूझीलंड हे तिन्ही देश पहिल्या स्थानावर आहेत. नॉर्वे, स्वीडन, स्वीत्झर्लंड, नेदरलँड, लक्झेमबर्ग, जर्मनी आणि सिंगापूर पहिल्या १० क्रमांकामध्ये आहेत. ब्रिटन ११ व्या, तर अमेरिका २७ व्या क्रमांकावर आहे. ट्रांसपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या दशकामध्ये भ्रष्टाचार न्यून करण्यासाठी जगभरात अतिशय तोकडे प्रयत्न झाले आहेत.