‘गंगावेस ते शिवाजी पूल’ आखरी रास्ता कामातील तांत्रिक अडचणी दूर करून रस्ता त्वरित पूर्ण करा ! – आखरी रास्ता कृती समिती कोल्हापूर

कोल्हापूर, १३ जानेवारी (वार्ता.) – गंगावेस ते शिवाजी पूल या रस्त्यासाठी कृती समितीच्या वतीने गेली ५ वर्षे जनआंदोलन चालू आहे. या रस्त्यातील काही काम पूर्ण झाले असून शुक्रवार गेट ते पंचगंगा तालीम हे काम स्व. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधीतून चालू असलेले काम अर्धवट झाले आहे. या कामात काही तांत्रिक अडचणी आहेत, असे उत्तर कोल्हापूर महापालिका प्रशासनाने दिले आहे. तरी या संदर्भात पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन ‘गंगावेस ते शिवाजी पूल’ आखरी रास्ता कामातील तांत्रिक अडचणी दूर करून त्वरित रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी ‘आखरी रास्ता कृती समिती कोल्हापूर’च्या वतीने करण्यात आली आहे.