‘सनातन धर्माच्या ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ची सेवा करतांना कर्नाटकातील साधकांनी केलेले प्रयत्न आणि त्यांना समाजातून मिळालेला उदंड प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

दैवी आशीर्वाद लाभलेले सनातनचे ग्रंथ

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी गुरुकृपेने सनातन संस्थेचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत) यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात १.९.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीत ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात आले. मागील लेखात आपण साधनेत किंवा अभियानात अडथळे आणणारे साधकांचे स्वभावदोष आणि अहं अन् त्यांचे निर्मूलन करण्याचे महत्त्व, अडथळ्यांवर मात करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर करायचे प्रयत्न आणि वेळेचे सुनियोजन यांविषयी पाहिले. या लेखात आपण ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला समाजातून मिळालेला उदंड प्रतिसाद पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/529160.html

१. ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला समाजातून मिळालेला उदंड प्रतिसाद !

१ अ. ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गाला जोडलेले धर्मप्रेमी आणि साधना सत्संगातील साधक कृतीशील होऊन सेवेत सहभाग घेत आहेत.

१. आ. ग्रंथांचे महत्त्व समजल्यावर धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्मप्रेमींनी स्वतःसाठी ग्रंथ विकत घेतले.

१. इ. एका जिज्ञासूने ६ ग्रंथांची मागणी दिली होती. अभियानाच्या उद्घाटनाचे ध्वनीचित्र (व्हिडिओ) ‘सोशल मिडिया’वर प्रसार करण्याची माहिती (पोस्ट) दिली होती. ते पाहून त्या जिज्ञासूने पुन्हा साधकांना भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘सनातन संस्थेचे इतके सारे ग्रंथ आहेत आणि त्याचे इतके महत्त्व आहे, तर तुम्ही मला अजून कोणते ग्रंथ आहेत, याची सूची पाठवा. ‘मी आणखी कोणते ग्रंथ घेऊ शकतो ?’, हे सांगतो.’’

१. ई. धारवाडमध्ये ‘एफ्.एम्.’ वाहिनीच्या मालकांना या अभियानाविषयी सांगितल्यावर त्यांनी संपूर्ण ग्रंथसंचांची मागणी दिली आणि म्हणाले, ‘‘हे ग्रंथ इतके चांगले आहेत, तर ग्रंथसंचांनुसार त्याच्या माहितीचे ध्वनीमुद्रण (रेकॉर्डिंग) करून आपण ते प्रक्षेपित करूया.’’ त्याप्रमाणे आठवड्यातून २ दिवस १० मिनिटे (रेडिओ) आकाशवाणीवर ग्रंथांविषयी प्रक्षेपण करण्यात येत आहे.

१. उ. तुमकूर जिल्ह्यात ‘एफ्.एम्.’वर आठवड्यातून ३ दिवस २० मिनिटे ‘ज्ञानशक्ती ग्रंथ प्रसार अभियान’ या विषयावर माहिती सांगण्यासाठी साधकांना बोलावले आहे.

१. ऊ. एका दूरचित्रवाणी (टी.व्ही.) वाहिनीचा कर्नाटकातील २२ जिल्ह्यांत प्रसार आहे. त्या वाहिनीच्या माध्यमातून अभियानाचा प्रसार केला. त्याचा चांगला प्रतिसाद पाहून वाहिनीने पितृपक्षाच्या संदर्भातील माहितीचे ध्वनीमुद्रण (रेकॉर्डिंग) देण्यास सांगितले, तसेच प्रतिदिन
२० मिनिटे धार्मिक कृतींविषयी माहिती सांगण्यासाठी वेळ दिली आहे.

१. ऐ. बागलकोट जिल्ह्यात धर्मशिक्षणवर्गात एक धर्मप्रेमी शिक्षिका आहेत. ‘शिक्षकदिना’च्या निमित्ताने शिक्षकांच्या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या सहकार्‍यांना सनातनचे ‘सुसंस्कार आणि अध्ययन कसे करायचे ?’, हे ग्रंथ दाखवून त्यांचे महत्त्व सांगितले. ते ऐकून सर्व शिक्षक प्रभावित होऊन ‘सुसंस्कार आणि नीतीकथा’ या ४० ग्रंथांची मागणी दिली. ‘शाळेतील मुलांना भेट देतांना हे ग्रंथ देऊया’, असे त्यांनी ठरवले.’

– श्री. काशीनाथ प्रभु (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सौ. मंजुळा रमानंद गौडा (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), श्री. विजय रेवणकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), कर्नाटक (ऑक्टोबर २०२१)


२. जिज्ञासूंना ग्रंथांविषयी माहिती सांगितल्यावर त्यांनी साधकांजवळ व्यक्त केलेले अभिप्राय

२ अ. सौ. चेतना शंकर, कुणीगल

सौ. चेतना शंकर

२ अ १. ‘एका धर्मप्रेमींनी माझ्यासाठी ‘कोणता ग्रंथ आवश्यक आहे ? हे तुम्हीच सांगा’, असे साधकांना सांगणे आणि त्यातून धर्मप्रेमींचा सनातनवर असलेला विश्वास लक्षात येणे : ‘बागलकोट जिल्ह्यातील एका धर्मप्रेमींना ग्रंथांविषयी माहिती सांगितली. त्यांनी अनेक ग्रंथ विकत घेतले आणि ते म्हणाले, ‘‘माझ्यापेक्षा तुम्हालाच मला कोणता ग्रंथ द्यायला हवा, हे ठाऊक आहे. तुम्हीच मला ग्रंथ निवडून द्या.’’ या प्रसंगातून ‘धर्मप्रेमींचा सनातनच्या साधकांवर किती विश्वास आहे ?’, हे लक्षात आले.

२ अ २. एका शाळेच्या माजी सचिवांनी संपर्कासाठी नवीन लोकांची नावे देणे आणि घरातील सर्व सदस्यांना एकत्रित करून साधना सांगण्यास सांगणे : बागलकोट जिल्ह्यात एका शाळेच्या माजी सचिवांना भेटण्यासाठी गेल्यावर त्यांनी स्वतःसाठी काही ग्रंथ विकत घेतले. त्यांनी संपर्क करण्यासाठी नवीन लोकांची नावे दिली आणि पुढे त्यांची शाळा चालू होणार आहे; म्हणून इंग्रजी ग्रंथांच्या एका संचांची मागणी केली. त्यांनी घरातील सर्व सदस्यांना एकत्रित करून त्यांना साधना सांगण्यास सांगितली. त्यांनी घरातील स्त्रियांना ‘साधिकांकडून साधना शिकून घ्या आणि त्यांच्या समवेत सेवेसाठी बाहेर जा’, असे सांगितले.

२ अ ३. एका सराफाच्या दुकानात गेल्यावर पूर्वीची ओळख नसूनही ग्रंथांविषयी माहिती सांगितल्यावर त्यांनी अलंकाराविषयीचे १००० ग्रंथ घेण्याची इच्छा व्यक्त केली.

२ अ ४. एका विश्वविद्यालयाच्या कुलपतींच्या पत्नीने सनातनचे ग्रंथ वाचून त्यांनी पैंजण घालण्यास चालू केल्याचे सांगणे : एका विश्वविद्यालयाच्या कुलपतीला भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या पत्नीने आयुर्वेदाचे ग्रंथ घेतले. त्या म्हणाल्या, ‘‘मी पूर्वीही एकदा सनातनचे ग्रंथ पाहिले होते. ते वाचून मला पुष्कळ आनंद झाला. ते वाचूनच मी पैंजण घालण्यास चालू केले.’’

२ अ ५. ‘कुंभार इंजिनीयर असोसिएशन’ यांनी एका कार्यक्रमात मुलांना शिष्यवृत्तीच्या समवेत सनातनचे ग्रंथही भेट देणे : बेंगळुरू जिल्ह्यात ‘कुंभार इंजिनीयर असोसिएशन’ने त्यांच्या समाजातील मुलांसाठी ‘प्रतिभा पुरस्कार’ कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात मुलांना शिष्यवृत्तीच्या समवेत ग्रंथही भेट दिले. उपस्थित मान्यवर आणि पदाधिकारी या सर्वांनाही त्यांनी सनातनचे ग्रंथ भेट म्हणून दिले.

२ अ ६. बेंगळुरू जिल्ह्यात अभियानाच्या निमित्ताने काही शाळा आणि महाविद्यालये यांना संपर्क करण्याचे नियोजन केले होते. ग्रंथालयातील शिक्षकांनी सांगितले, ‘‘तुमचे कार्य चांगले आहे. आम्हालाही सत्संगाला जोडून घ्या.’’

२ अ ७. ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गात सनातनच्या ग्रंथांचे महत्त्व सांगितल्यावर एका धर्मप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर ग्रंथांची मागणी करणे : म्हैसुरू जिल्ह्यात एका ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गात चेन्नई येथून एक धर्मप्रेमी जोडलेले असतात. त्यांना सनातनच्या ग्रंथांचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी लगेच लघु आणि मोठ्या ग्रंथांची मागणी दिली. त्यांनाही ग्रंथ अतिशय चांगले वाटले.

२ अ ८. एका विश्वविद्यालयाने त्यांच्या अंतर्गत येणार्‍या १० महाविद्यालयांसाठी १० ग्रंथ संचाची मागणी करणे आणि सनातनच्या कार्याची प्रशंसा करणे : तुमकुर जिल्ह्यात एका विश्वविद्यालयात जाऊन ग्रंथांची माहिती सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या अंतर्गत येणार्‍या १० महाविद्यालयांसाठी १० ग्रंथ संचाची मागणी दिली. त्यांनी सनातन संस्थेच्या कार्याची प्रशंसाही केली. त्यांनी काही महत्त्वाच्या व्यक्तींनाही ग्रंथाविषयी माहिती सांगितली. ते म्हणाले, ‘‘मला ही कृती करून काही प्रमाणात या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळाली, यासाठी मला कृतज्ञता वाटली.’’

२ अ ९. तुमकुरू जिल्ह्यातील एका शिक्षकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले विचार सांगून मी शिकवण्यास प्रारंभ करत असल्याचे सांगणे आणि ‘सोशल मिडिया’च्या माध्यमातून सर्व काही समाजात पाठवण्याच्या दृष्टीने पुष्कळ चांगले कार्य करत असल्याचे सांगणे : तुमकुरू जिल्ह्यात अभियानानिमित्त एका शाळेत गेल्यावर तेथील मुख्याध्यापकांनी सांगितले, ‘‘ही शाळा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच चालू आहे. त्यांनी सांगितलेले विचार सांगून मी शिकवणे चालू करतो. तुम्ही ‘सोशल मिडिया’च्या माध्यमातून जे लिखाण पाठवत आहात, ते त्यांच्या अन्य गटात आणि त्यांच्या पालकांच्या गटांमध्ये पाठवत आहे. तुम्ही पुष्कळ चांगले कार्य करत आहात.’’
‘हे ऐकून परात्पर गुरुदेवांनी समाजात चैतन्याचे बीज पेरले आहे’, असे अनुभवण्यास आले आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

२ आ. श्री. गुरुप्रसाद गौडा (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), मंगळुरू

१. ‘आम्ही उडुपी येथील एका प्रतिष्ठित व्यक्तीला भेटण्यासाठी गेलो होतो. ‘त्यांच्याशी बोलतांना ते साधकांची वाट पहात होते’, असे मला जाणवले. ते म्हणाले, ‘‘हे ग्रंथ मलाही हवे आहेत आणि मी इतरांनाही हे ग्रंथ देऊ शकतो.’’ असेच अजून २ उद्योगपतींनीही साधना आणि ग्रंथ यांविषयी पुष्कळ जाणून घेतले.

२. एका महाविद्यालयाच्या संस्थापकांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांनी १ घंटा ‘धर्म आणि साधना’ यांविषयी चर्चा केली अन् त्यांचे अनुभव सांगितले. ग्रंथांची माहिती घेतली.

३. एका शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीला भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांना संस्थेचे कार्य आणि ग्रंथांचे महत्त्व सांगितल्यावर पुष्कळ चांगले वाटले. त्यांनी सांगितले, ‘‘१५ शाळांमध्ये लहान मुलांसंबंधी ग्रंथ देण्यासाठी प्रयत्न करतो आणि या कार्याला माझे पूर्णतः सहकार्य असेल.’’

४. एक सनदी लेखापाल (चार्टर्ड अकांऊटंट) यांची भेट झाली. त्यांना सर्व ग्रंथांची माहिती सांगितली. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘सर्वच ग्रंथ उपयुक्त आहेत. ‘कोणता ग्रंथ नको’, असे वाटत नाही’’ आणि त्यांनी सर्व ग्रंथ विकत घेतले.
संपर्काच्या वेळी अशा पुष्कळ अनुभूती आल्या. प्रत्येक संपर्कात आम्हाला आनंद मिळत होता आणि संपर्क करणार्‍यांनाही आनंद मिळत होता. संपर्काला जाण्यापूर्वी ‘या कार्यात काही अडचण येऊ नये, सर्वांना या ग्रंथांचा लाभ होऊ दे’, अशा प्रार्थना पू. रमानंद अण्णा करत होते. ‘गुरुदेवांचा संकल्प आणि संतांची तळमळ यामुळे ही सेवा करण्याची संधी मिळाली’, यासाठी गुरुदेव आणि संत यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

२ इ. श्री. मोहन गौडा, बेंगळुरू

१. ‘बेंगळुरूमध्ये एका हिंदुत्वनिष्ठांनी सांगितले, ‘‘हिंदु राष्ट्राविषयी कुणीही काही विचारले, तर मला उत्तर देता यायला हवे, यासाठी मला सर्व ग्रंथांचा १ संच हवा.’’

२. एका अधिवक्त्यांनी सांगितले, ‘‘प्रत्येक ग्रंथ पुष्कळ अमूल्य आहे.’’

३. एका वेदपाठशाळेला संपर्क केला होता. तेथील आचार्य म्हणाले, ‘‘आमच्याकडे वेदपाठशाळा आहे, तेथे पुष्कळ ग्रंथ आहेत; परंतु असे ग्रंथ मी आतापर्यंत कधीच पाहिले नाहीत. आमच्या वेदपाठशाळेसाठी संपूर्ण ग्रंथाचा १ संच हवा.’’

(ऑक्टोबर २०२१) (क्रमशः पुढील रविवारी)