‘सनातन पंचांगा’च्या अचूकतेविषयी एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या उपसंपादकांनी दाखवलेला विश्वास !

श्री. दत्तात्रय पिसे

‘एका शहरातील एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या उपसंपादकांनी भ्रमणभाषवरून पंचांगाची मागणी केली होती. ती देण्यासाठी गेल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘आमच्या दैनिकाची दिनदर्शिका अंतिम टप्प्यात आहे. त्यातील महत्त्वाचे दिनविशेष आणि तिथी पडताळण्यासाठी तुमचे सनातन पंचांग मला आवश्यक होते. मागील वर्षापासून आमच्या दिनदर्शिकेमधील त्रुटी मी तुमच्या पंचांगाप्रमाणे पडताळून दुरुस्त करतो. ‘आमची दिनदर्शिका अचूक व्हावी’, यासाठी मी पूर्वी एक पंचांग वापरत असे; पण त्या पंचांगामध्येही मला काही त्रुटी मिळाल्या होत्या, तसेच एक प्रसिद्ध दिनदर्शिकासुद्धा मी वापरली; पण बारकाईने पाहिल्यावर तिच्यातही मला बर्‍याच चुका मिळाल्या. केवळ ‘सनातन पंचांगा’मध्ये मला तिथी आणि दिनविशेष यांसंबंधात आजवर कोणत्याही चुका मिळाल्या नाहीत. त्यामुळे आमची दिनदर्शिका अचूक होण्यासाठी आजतरी ‘सनातन पंचांग’ हेच माझ्यासाठी प्रमाण आहे, तसेच तुमच्या पंचांगात पंचक दिलेले असते. तेसुद्धा पुष्कळ उपयोगी आहे.’’

– श्री. दत्तात्रय पिसे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सोलापूर (९.१.२०२०)