बल्लभगड (हरियाणा) येथील सरकारी भूमीवरील अवैध मजार हिंदुत्वनिष्ठांनी तोडून टाकली !

प्रशासनाला कारवाई करण्याचे दिले होते निवेदन !

  • अवैध बांधकामांवर कारवाई न करणार्‍या प्रशासनावरही कारवाई होणे आवश्यक !- संपादक
  • प्रशासनाला निवेदन देऊनही कारवाई होत नसेल, तर असे प्रशासन काय कामाचे ? सरकारी भूमीवर अवैध मजार बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? – संपादक
लैंगिक संबंधांशी संबंधित, तसेच महिलांचे वशीकरण करण्याविषयीची औषधे दाखविताना हिंदुत्ववादी

फरिदाबाद (हरियाणा) – येथील बल्लभगडमध्ये बांधण्यात आलेली अवैध मजार (इस्लामी पीर किंवा फकिर यांची समाधी) हिंदुत्वनिष्ठांनी रात्रीच्या वेळी तोडून टाकली. येथे त्यांना लैंगिक संबंधांशी संबंधित, तसेच महिलांचे वशीकरण करण्याविषयीची औषधे सापडली. ही मजार येथील बल्लभगड पंचायत भवनच्या भूमीवर बांधण्यात आली होती. या मजारला ‘बाबा भूरेशाह की मजार’ असे नाव देण्यात आले होते. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या मजारचा मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) अब्दुल गफार होता. तो हिंदु महिलांना भूलवण्यासाठी स्वतःचे नाव ‘बबली’ सांगत होता. तोडफोडीनंतर पोलिसांनी या मौलवीला कह्यात घेतले आहे. हिंदु संघटनांनी यापूर्वीच या मजारवर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले होते. तसेच येथे मंदिर बांधण्याची मागणी केली होती.