पुणे जिल्ह्यातील ७९२ प्राथमिक शाळांचा वीजपुरवठा खंडित !

शाळेतील वीज मीटरची जोडणी काढतांना महावितरणचे कर्मचारी 

पुणे – येथील पुणे जिल्हा परिषदेच्या कह्यातील प्राथमिक शाळेतील वीजदेयक न भरल्याने महावितरणने ७९२ शाळांचा वीजपुरवठा खंडित केला आहे, तर १२८ शाळांतील वीज मीटरची जोडणी महावितरणने काढून टाकल्याची माहिती समोर येत आहे. (वीजदेयक न भरणार्‍या संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. – संपादक) या घटनेमुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांकडून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ३ सहस्र ६३९ शाळा जिल्हा परिषदेकडे आहेत. या शाळांमध्ये भोर, वेल्हा, मुळशी, बारामती, दौंड आणि इंदापूर या तालुक्यांतील अनुमाने ४०२ शाळांचा समावेश आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे म्हणाले की, ग्राम निधीतून थकीत वीजदेयक भरण्यात यावेत, असा आदेश प्रत्येक ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेकडून देण्यात आला आहे.