क्रूरकर्मा औरंगजेबाने आतषबाजी करण्यावर घातली होती बंदी !

  • औरंगजेबाच्या आदेशाची प्रत बिकानेरच्या राज्य संग्रहालयामध्ये उपलब्ध

  • आदेशात विशिष्ट सण आणि कालावधी यांचा उल्लेख मात्र नाही

औरंगजेबाचे जणू आधुनिक वंशज असल्याप्रमाणे आता पुरोगाम्यांना केवळ हिंदूंच्याच सणांच्या वेळी फटाके फोडण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्याचा आणखी चेव चढेल ! – संपादक

औरंगजेबाच्या आदेशाची प्रत आणि औरंगजेब

नवी देहली – हिंदुद्वेष्ट्या औरंगजेब यानेही त्याच्या काळात आतषबाजी करण्यावर बंदी घातली होती, असे आता समोर आले आहे. औरंगजेबाच्या या आदेशाची प्रत बिकानेरच्या राज्य संग्रहालयामध्य उपलब्ध आहे. मागील काही वर्षांपासून काही राज्यांकडून दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी घातली जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर औरंगजेबाचे हा आदेश सध्या चर्चेचा विषय ठरला आहे

१. औरंगजेबाचा आतषबाजी न करण्याचा आदेश ८ एप्रिल १६६७ या दिवशी काढला होता. त्यात त्याने म्हटले होते की, ‘आतषबाजी करण्यावर बंदी घाला आणि तसे बादशाहच्या प्रदेशातील अधिकार्‍यांनाही सांगा. कुणीही आतषबाजी करू नये, अशी प्रदेशात घोषणाही करा.’ या आदेशामध्ये विशिष्ट सण आणि कालावधी यांचा उल्लेख मात्र आढळून येत नाही.

आदेशाचे हिंदी भाषांतर

२. याविषयी ‘राजस्थान राज्य संग्रहा’चे संचालक महेंद्र सिंह खडगावत म्हणाले, ‘‘औरंगजेबाच्या काळात आतषबाजीवर बंदी घालण्यात आली होती. एप्रिल १६६७ मधील, म्हणजे औरंगजेबाच्या काळातील पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे. त्या पत्रामध्ये दिवाळीचा उल्लेख नाही आहे; परंतु ते पत्र खरे आहे.’’