सरकारने दिवाळीसाठी सर्वसामान्य जनतेला रास्त दरात अत्यावश्यक साहित्य द्यावे ! – ग्राहक मंचची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

सावंतवाडी – सध्याच्या काळात कोरोना महामारीमुळे त्रस्त झालेल्या कुटुंबांना दिवाळीसाठी शासनाने रास्त दराच्या दुकानातून गहू, तांदूळ, तेल, तुरडाळ, रवा, मैदा आणि साखर आदी मूलभूत आणि अत्यावश्यक साहित्य पुरवावे अन् सर्वसामान्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष प्रा. एस्.एन्. पाटील यांनी ई-मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, ग्राहक संरक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना पाठवले आहे.