सांगली येथील अधिवक्त्या प्रीती पाटील यांना त्यांच्या घरी येत असलेल्या ‘भारद्वाज’ पक्ष्याविषयी जाणवलेली सूत्रे

अधिवक्त्या प्रीती पाटील

१. ‘गेल्या २ – ३ वर्षांपासून आमच्या घरी ‘भारद्बाज’ हा पक्षी येत आहे. आम्ही त्याच्यासाठी घराच्या भिंतीवर पाणी आणि पोळी ठेवतो. तो प्रतिदिन येतो. त्यामुळे त्याला आमची सवय झाली आहे. तो आल्यानंतर आम्ही त्याच्यासाठी पोळी ठेवतो, तरी तो जवळच बसलेला असतो आणि आम्ही जवळ गेलो, तरी तो उडून जात नाही.

२. त्याला भूक लागली असेल आणि भिंतीवर घातलेली पोळी संपली असेल, तर तो कट्टयावर येऊन बसतो. आम्ही कुणी दिसलो नाही किंवा भिंतीवर पोळी ठेवली नसेल, तेव्हा तो घरात येतो आणि आमच्या भोवती घुटमळत रहातो.

३. ‘थांब, पोळी देते’, असे माझ्या आईने सांगितल्यावर ‘तो प्रतिसाद देत आहे’, असे मला जाणवते. आई पोळी घेऊन बाहेर आल्यावर तो तिच्या मागे मागे जातो.

आमच्या घरी भारद्बाज पक्ष्याप्रमाणे अन्य पक्षीही येत असतात. सकाळ-संध्याकाळ त्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकतांना मला चांगले वाटते. आमच्या घराभोवती फुलझाडे लावलेली आहेत. त्यामुळे फुलपाखरेही येत असतात.’

– अधिवक्त्या प्रीती पाटील, सांगली (२५.१२.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक