‘साधकांनो, आध्यात्मिक उन्नती जलद होण्यासाठी परिपूर्ण सेवा करा !’
दैनिकातील लिखाणामध्ये अनेक वेळा परकीय, कठीण किंवा अप्रचलित शब्द येतात. वाचकांना या शब्दांचे अर्थ कळावे आणि लिखाणाचे सहजतेने आकलन व्हावे, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अशा शब्दांचे अथवा संज्ञांचे अर्थ लिहिण्यास सांगितले. ! कठीण शब्द मथळ्यात आले, तर तेथेही त्यांचा अर्थ लिहिला, तर वाचकांना ते अधिक सोयीचे होते’, हेही त्यांनी सांगितले. काही वेळा काही संज्ञांचे अर्थ मोठे असतात, अशा वेळी मथळ्यात ‘टीप’ असे लिहून त्याखाली अर्थ लिहिण्यास परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले. वास्तविक अलीकडे लेखनक्षेत्रात स्वतः किती श्रेष्ठ आहोत, हे दर्शवण्यासाठी बोजड आणि कठीण शब्द वापरण्याची पद्धत रूढ होत आहे. अशा काळात वाचकांचा इतका विचार करणारे आणि सहज-सोप्या भाषेत राष्ट्र-धर्म यांचा दृष्टीकोन प्रसारित करण्यास उद्युक्त करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले एकमेवाद्वितीय आहेत !
अशी वाचकाभिमुख लिखाण प्रसिद्ध करण्याची शिकवण असूनही दैनिकाची सेवा करणार्या साधकांकडून यासंदर्भात झालेल्या काही चुका उदाहरणादाखल येथे प्रसिद्ध करत आहोत.
– श्री. भूषण केरकर (६७ टक्के आध्यात्मिक पातळी), सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके