रंगपूर (बांगलादेश) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या ६५ घरांची जाळपोळ

जमात-ए-इस्लामीकडून आक्रमण

रंगपूर (बांगलादेश) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या ६५ घरांची जाळपोळ

रंगपूर (बांगलादेश) – येथील पीरगंजमधील जेलपोटी गावामध्ये धर्मांधांनी हिंदूंच्या ६५ घरांवर आक्रमण करून त्यांना आगी लावल्या. यात २० घरे पूर्णपणे जळून त्यांची राख झाली आहे. या आक्रमणामागे फेसबूकवर एका हिंदु व्यक्तीकडून करण्यात आलेली एक आक्षेपार्ह पोस्ट कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे. ज्या हिंदु व्यक्तीने पोस्ट केली होती, तिला पोलिसांनी संरक्षण पुरवल्यावर धर्मांधांनी त्याच्या शेजारील घरांना आगी लावल्या. याविषयी ‘ढाका ट्रिब्यून’ चे अध्यक्ष महंमद सादकुल इस्लाम यांनी सांगितले की, हे आक्रमण जमात-ए-इस्लामी या संघटनेचे कार्यकर्ते, तसेच या संघटनेच्या विद्यार्थी संघटनेतील विद्यार्थी यांनी केले आहे.