माते, आम्हा जिवांची गुरुचरणांची आस कधी अल्प होऊ देऊ नकोस ।

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची आठवण आल्यानंतर त्यांची स्तुती करणारे काव्य देवाने मनाच्या पटलावर उमटवून ते लिहून घेतले. श्रीमन्नारायणरूपी गुरुदेवांनी सुचवलेल्या या ओळी गुरुदेवांच्या चरणी समर्पित करत आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
श्री. अविनाश जाधव

माते, तू नावाने केवळ
अन् केवळ बिंदारूपी आहेस ।
मात्र तुझे गुरुकार्य आकाशाला गवसणी घालत आहे ।। १ ।।

माते, तुझ्या वाणीतून सदैव चैतन्य प्रक्षेपित होते ।
वाणीतील चैतन्य अवकाशातून
पडणार्‍या मेघधारेप्रमाणे भासते ।। २ ।।

माते, तुझ्या डोळ्यांतून नेहमी करुणेचा झोत येतो ।
करुणेचा झोत हृदयाला भिडून
आम्हा जिवांना उभारी देऊन जातो ।। ३ ।।

माते, तुझी प्रत्येक कृती गुरुकार्यासाठी असते ।
गुरुकार्यातून हिंदु राष्ट्राची पहाट
जवळ आल्याचे जाणवते  ।। ४ ।।

माते, आम्हा साधकांना तू सदैव प्रोत्साहित करतेस ।
गुरुकार्याच्या गोवर्धनाला काठ्या
लावण्याची जाणीव करून देतेस ।। ५ ।।

माते, श्रीमन्नारायणरूपी गुरुदेवांनंतर
तूच आम्हाला गुरुरूपी आहेस ।
आम्हा जिवांची गुरुचरणांची
आस कधी अल्प होऊ देऊ नकोस ।
हीच प्रार्थना करतो, तुला आम्ही
सारे जीव आजच्या वाढदिनी ।। ६ ।।

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांना ग्रंथ विभागातील सर्व साधकांकडून वाढदिवसानिमित्त शिरसाष्टांग नमस्कार !

– श्रीमन्नारायणामस्तु ।

श्री. अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.९.२०२०)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक