|
नागपूर – येथील यशोधरानगरमधील एका २४ वर्षीय तरुणीचे सोहेल वहाब खान याने लैंगिक शोषण केले. ती गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. या प्रकरणी धर्मांध खान याला पोलिसांनी अटक केली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार जेव्हा पीडित तरुणी गर्भवती राहिली, तेव्हा धर्मांध खान याने तिच्यावर गर्भपात करण्यास दबाव आणला होता. त्याला बळी पडून तिने गर्भपात केला. सोहेल हा विवाहित आहे. पोलीस या प्रकरणाचे पुढील अन्वेषण करत आहेत. ‘सोहेल खान आणि पीडित तरुणी जवळपास गेल्या ६ वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. सोहेल याने वर्ष २०१६ पासून पीडितेचे वारंवार लैंगिक शोषण केले’, असा आरोप पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे.
Horrific! 24-year-old #rape survivor performs self #abortion after watching #YouTube videoshttps://t.co/VaxnQMxMZG
— Zee News English (@ZeeNewsEnglish) September 26, 2021
खोटी आश्वासने देऊन फसवणूक !
गेल्या आठवड्यात तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधला. पीडितेच्या कुटुंबाला असे वाटते की, सोहेल याने तिला खोटी आश्वासने देऊन फसवले; कारण तो आधीच विवाहित असून त्याला एक अपत्यही आहे.
सोहेल याचा २ वेळा विवाह !
‘सोहेल खान हा चालक असून यापूर्वी त्याचा दोनदा विवाह झाला आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्याने काही वर्षांपूर्वी दुसरा विवाह केला होता. त्याला एक मुलगाही आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी २३ सप्टेंबर या दिवशी सोहेलविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.