‘८.९.२०२० या दिवशी ध्यानमंदिरात दत्ताचा नामजप करतांना मला सलग ५ मिनिटे सुगंध आला. नंतर मला ‘सर्व देवतांचे दर्शन होऊन त्यांना अनेक फुलांच्या हारांनी सजवले आहे’, असे दिसत होते. ध्यानमंदिरातील ‘महादेवाच्या पिंडीवरील नागाला पुष्कळ सजवले आहे’, असे मला दिसले. नंतर मला कुलदेवीचे दर्शन झाले आणि पुन्हा मला बराच वेळ चंदनाचा सुगंध आला.’
– श्री. हनुमंत शिंदे (वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.९.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |