आमचा ‘सनातन प्रभात’ व्यासपीठ आहे गुरूंचे ।
तिथे अधिष्ठान आहे नित्य भगवंताचे ।। १ ।।
त्यावरील अक्षर अन् अक्षर म्हणजे भगवंताचा शब्द ।
वाचणारा होऊ दे तन्मय अन् निःशब्द ।। २ ।।
मिळावी प्रत्येकाला आनंदमय ज्ञान आणि भक्ती ।
या ज्ञानभक्तीनेच अखंड हिंदुस्थानची मिळेल शक्ती ।। ३ ।।
भक्तीचा परिमळ (सुगंध) दरवळेल अध्यात्माच्या विश्वात ।
एकच सनातन धर्म असेल, नसेल अन्य जात-पात ।। ४ ।।
त्या मंगलमय धर्माने जगाला मिळेल आनंदाचा ठेवा ।
देवा, तुझ्या अधरी मधुर स्वरांचा वाजेल पावा ।। ५ ।।
‘सनातन प्रभात’ची अक्षरे बनतील एक एक मंत्र ।
त्या सामर्थ्यवान शब्दमंत्राने बंद होणार पाताळ यंत्र ।। ६ ।।
– पुष्पांजली, बेळगाव, कर्नाटक. (२७.१०.२०१८)