पाक – चीन आर्थिक महामार्गाचे काम ३ वर्षांपासून ठप्प असल्याने चीनची आस्थापने अप्रसन्न !

‘पाकवर जो विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला’, याचा प्रत्यय अमेरिकेने घेतला आहे आणि आता चीनही घेत आहे, हेच यातून स्पष्ट होते ! – संपादक

बीजिंग (चीन) – चीनकडून बांधण्यात येणारा चीन-पाक आर्थिक महामार्गाचे पाककडून संथगतीने काम चालू असल्यामुळे हा महामार्ग बांधून पूर्ण झालेला नाही. यामुळे चीनची आस्थापने अप्रसन्न आहेत. मागील ३ वर्षांत या प्रकल्पाचे काम रखडल्यामुळे  पाकिस्तानच्या खासदारांच्या गटानेही चिंता व्यक्त केली आहे. या प्रकल्पासाठी चीनने साडेचार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. खासदारांच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले सलीम मांडवीवाला म्हणाले, ‘‘चिनी राजदूताने माझ्याकडे तक्रार केली की, तुम्ही महामार्गाला नष्ट केले आहे आणि गेल्या ३ वर्षांत कोणतेही काम झालेले नाही.’’