सनातनच्या १०९ व्या समष्टी संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांची पू. सदाशिव (भाऊ) परब यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. सदाशिव परब

वारणानगर, जिल्हा कोल्हापूर येथील डॉ. शरदिनी कोरे यांचे पती डॉ. सुधाकर कोरे यांचे २३.८.२०२० या दिवशी निधन झाले. निधनाची वार्ता समजल्यावर मला डॉ. शरदिनी कोरे यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा झाली होती; मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ते शक्य झाले नाही. अखेरीस परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे २२.६.२०२१ या दिवशी तो योग जुळून आला. मी काही कारणानिमित्त वारणानगर, जिल्हा कोल्हापूर येथे गेल्यावर डॉ. शरदिनी कोरे यांना भेटण्याचा तीव्र विचार मनात आल्याने त्यांच्या घरी गेलो.

पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे

१. वारणानगर, जिल्हा कोल्हापूर येथे झालेली डॉ. शरदिनी कोरे यांची भेट

१ अ. पतीनिधनाच्या दुःखद प्रसंगाला साधनेच्या बळावर सामोर्‍या जाणार्‍या डॉ. शरदिनी कोरे यांच्या तोंडवळ्यावर चैतन्य जाणवून ‘त्यांची आध्यात्मिक पातळी वाढली असावी’, असे वाटणे : साधनेच्या बळावर डॉ. शरदिनी कोरे अत्यंत कठीण प्रसंगाला सामोर्‍या गेल्या आणि त्यांनी पतीनिधनाचे दुःख सहन केले. मला त्या समाधानी दिसल्या. त्यांच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते आणि ‘त्यांची आध्यात्मिक पातळी वाढली असावी’, असे वाटत होते. त्या माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत होत्या आणि पुष्कळ आनंदी दिसत होत्या.

डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे

१ आ. आधुनिक वैद्य (डॉ.) नितीन कोठावळे गंभीर स्थितीत असूनही त्यांनी दोन शब्द बोलणे : मी डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे यांचे पती डॉ. नितीन कोठावळे यांनाही भेटलो. वर्षभरापासून ते रुग्णाईत होते. त्यांची स्थिती अत्यंत गंभीर होती, तरी ते माझ्याशी दोन शब्द बोलले. २९.६.२०२१ या दिवशी त्यांचे निधन झाले.

२. ‘विनम्रता, गुरुसेवेची तीव्र तळमळ आणि गुरूंप्रती असलेली श्रद्धा’ या गुणांमुळे डॉ. शरदिनी कोरे यांनी संतपद अन् डॉ. शिल्पा कोठावळे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे

आधुनिक वैद्य (डॉ.) सुधाकर कोरे यांचे निधन आणि नंतर आधुनिक वैद्य (डॉ.) नितीन कोठावळे यांचे निधन, असे एकाच वर्षात दोन आघात होऊनही डॉ. शरदिनी कोरे आणि डॉ. शिल्पा दोघीही स्थिर होत्या. या दोघीही साधनेत आणि व्यवहारात कुठेही न्यून पडल्या नाहीत. त्यांच्यातील ‘विनम्रता, मनमोकळेपणा, समजूतदारपणा, आज्ञापालन, तत्त्वनिष्ठता, गुरुसेवेची तीव्र तळमळ आणि गुरूंप्रती असलेली अपार श्रद्धा’ या गुणांमुळेच त्यांच्यावर परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा झाली अन् डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांनी संतपद गाठले, तर डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. ही वार्ता ऐकून माझ्यासह कोल्हापूर सेवाकेंद्रातील सर्व साधकांना पुष्कळ आनंद झाला.’   आपला चरणसेवक, – (पू.) सदाशिव (भाऊ) परब, कोल्हापूर (२३.८.२०२१)