गडहिंग्लज नगर परिषदेने भाविकांना वहात्या पाण्यात विसर्जनास अनुमती द्यावी ! – हिंदु जनजागृती समितीचे मुख्याधिकारी अनंत मुतकेकर यांना निवेदन

गडहिंग्लज येथील मुख्याधिकारी अनंत मुतकेकर (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर), १४ सप्टेंबर (वार्ता.) – गडहिंग्लज नगर परिषदेने गौरी, तसेच घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनावर बंदी घातली असून शहरात २२ ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली आहे. याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी अनुमती देण्यात येणार नाही, असा आदेश काढला आहे. वहात्या पाण्यातील विसर्जनावर निर्बंध आणल्याने श्री गणेशभक्तांसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याचा तीव्र निषेध केला आहे. तरी श्री गणेशभक्तांना कोणतीही सक्ती न करता श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करू द्यावे, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर जोर धरत आहे. या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडहिंग्लज येथे १४ सप्टेंबर या दिवशी मुख्याधिकारी अनंत मुतकेकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री मदन हावळ, किसन बिलावर, अमोल बिलावर, सचिन बिलावर आणि वामन बिलावर उपस्थित होते.