|
लंडन (ब्रिटन) – माझ्यामते इस्लामवादी विचारसरणी आणि त्यामुळे होणारी हिंसा सुरक्षेसाठी प्रमुख धोका आहे. यावर आपण वेळीच अंकुश आणला नाही, तर त्याची हानी आपल्यालाच होणार आहे, अशी चेतावणी ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी दिली. अमेरिकेमध्ये ११ सप्टेंबर २००१ या दिवशी झालेल्या आतंकवादी आक्रमणाला यंदा २० वर्षे पूर्ण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर लंडनमध्ये ‘रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट’मध्ये भाषण देतांना ब्लेअर बोलत होते. (अमेरिकेमध्ये झालेल्या एका आतंकवादी आक्रमणावरून जागतिक स्तरावर चर्चा केली जाते; मात्र काश्मीरमध्ये ३२ वर्षांपासून सहस्रो हिंदूंना ठार करून तितक्याच हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडण्यात आल्याच्या इस्लामीवाद्यांच्या आक्रमणाविषयी भारतात आणि परदेशातही विशेष कुणी बोलत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक)
Sky News host Paul Murray says former UK Prime Minister Tony Blair has “reminded us” why it matters that the Taliban are back in charge and “what the scale of radical Islam is”.https://t.co/Nrm05ZDn2v
— Sky News Australia (@SkyNewsAust) September 7, 2021
‘अफगाणिस्तानवर तालिबानने मिळवलेले नियंत्रण हे कट्टरतावादी इस्लामी विचारसणीचा धोका असून त्याकडे कानाडोळा करता येणार नाही’, असेही ब्लेअर यांनी सांगितले.
ब्लेअर म्हणाले की,
१. कट्टरतावादी इस्लाम हा ‘इस्लामवादा’ला म्हणजेच धर्माला राजकीय सिद्धांत बनवण्यावर विश्वास ठेवतो. इतकेच नाही, तर स्वतःचा हा हेतू साध्य करण्यासाठी सशस्त्र संघर्ष आवश्यक असल्यास तोसुद्धा योग्य असल्याचे या कट्टरतावादी विचारसरणीमध्ये मानले जाते. इतर इस्लामवाद्यांनाही अशाच गोष्टींची अपेक्षा आहे; मात्र ते हिंसेपासून दूर रहातात. तरीही त्यांची विचारसरणी ही मुक्त, आधुनिक आणि सांस्कृतिक स्तरावर सहिष्णु समाजाच्या विचारसरणीसमवेत विरोधाभास दर्शवणारी आहे.
२. तालिबान ही संघटना जागतिक स्तरावर कट्टरतावादी इस्लामी आंदोलनाचा एक भाग आहे. यामध्ये वेगवेगळ्या संघटनांचा सहभाग आहे. या सर्व संघटना वेगवेगळ्या असल्या, तरी त्यांची विचारसरणी सारखीच आहे.