१. प्रेमभाव
‘श्री. देशमुखकाकांना कोणतीही अडचण सांगितल्यास ते लगेच साहाय्य करतात. ते प्रत्येकाशी मनमोकळेपणाने बोलतात.
२. सत्याची कास धरणे
‘प्रतिष्ठित व्यक्ती’ म्हणून त्यांना समाजात मान्यता होती. देवाला त्यांचे उर्वरित आयुष्य साधनामय करायचे होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात वावरत असतांनाही त्यांना कधी खोटेपणाचे पांघरूण घेणे जमले नाही.
३. सेवेची तळमळ
अ. सेवा करण्यासाठी विभागात वेळेत येण्याची त्यांची सतत धडपड असते.
आ. सहसाधकांना सेवेत साहाय्य करतांना ते परिपूर्णरित्या त्यात सहभागी असतात.
इ. काका म्हणजे झोकून देऊन सेवा करणारी व्यक्ती. इंग्रजी पाक्षिक ‘सनातन प्रभात’साठी आणि अन्य लेखांचे इंग्रजीत भाषांतर करतांना त्यांचा ‘सामाजिक जाणीव अन् साधना या स्तरांवर वाचकाला समजेल, अशी वाक्यरचना हवी’, असा दृष्टीकोन असतो. ‘एखादा लेख भाषांतरासाठी आल्यावर तो लेख किंवा तसे लिखाण आधी भाषांतर केले आहे’, हे त्यांच्या लक्षात असते आणि ते ती धारिका तत्परतेने शोधून काढतात.
ई. ‘सनातन प्रभात’साठी वार्तासंकलनाची सेवा करतांना त्यांच्याकडे त्या सेवेसाठी आवश्यक असणार्या सर्व गोष्टींची जाणीव आणि सामान्य ज्ञान आहे. ‘त्याचा साधनेसाठी कसा उपयोग होईल ?’, असा ते विचार करतात.
उ. त्यांची प्रकृती बरी नसतांनाही त्यांना सेवेचा ध्यास असायचा. ते सांसारिक जीवनातून विभक्त झाल्याने त्यांच्या त्यागी वृत्तीमुळेच ते सेवारत राहू शकतात.
४. काका सेवारत असतांना देवाने त्यांच्या पत्नीची काळजी घेणे
ते सतत सेवारत असल्याने देवाने त्यांच्या पत्नीची (कै. (सौ.) अरुणा देशमुख (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के यांची) पूर्ण काळजी घेतली. पत्नीच्या निधनानंतर काकांवरचे सांसारिक दायित्व न्यून झाले. ‘सेवारत रहाणार्यांचा ईश्वर योगक्षेम कसा वहातो !’, ते देवाने काकांच्या माध्यमातून दाखवले.
५. साक्षीभाव
पूर्वी ते स्वतःच्या प्रकृतीविषयी पुष्कळ विचार करायचे; पण आता ते त्याकडे साक्षीभावाने पहातात.
६. स्वतःला पालटण्याची तळमळ
ते दैनिक ‘सनातन प्रभात’मधील विविध लेखांतील सूत्रे आचरणात आणून स्वतःला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) त्यांना सेवेत सतत साहाय्य करतात’, हे लक्षात आले.
७. काकांमध्ये व्यक्त भाव आहे. ‘गुरुदेवांमुळेच माझी साधना होते’, हे सांगताना त्यांचा भाव जागृत होतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे त्यांच्या कृपाछत्रात राहून समाजातील एक बुद्धीवादी आणि राजकीय वर्तुळात वावरणारी व्यक्ती साधनेमुळे ‘स्वतःत कसा पालट करू शकते !’, याचे आदर्श उदाहरण म्हणजे देशमुखकाका आहेत.’
– प्राण्यांचे आधुनिक वैद्य (डॉ.) अजय जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.८.२०२१)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |