सद्गुरु गाडगीळकाकांना,
साष्टांग नमस्कार.
१. सद्गुरु गाडगीळकाकांनी ‘साधकांची प्रतिकारक्षमता वाढावी आणि त्यांचे सर्वांगांनी रक्षण व्हावे’, यासाठी नामजप सिद्ध करणे : कोरोनाची महामारी चालू झाली. सगळीकडे औषधोपचार शोधण्याचे प्रयत्न चालू असतांनाच तुम्ही साधकांना नामजपरूपी जी संजीवनी प्रदान केली, त्याबद्दल तुमच्या चरणी मनापासून कृतज्ञता ! कोरोना काळात साधकांची प्रतिकारक्षमता वाढावी आणि त्यांचे सर्वांगांनी रक्षण व्हावे, यासाठी ‘श्री दुर्गादेवी’, ‘दत्तगुरु’ आणि लयाची देवता ‘भगवान शिव’, यांनाच जणू तुम्ही आमच्यासाठी बोलावले आणि जप सिद्ध केला. (कोरोनाविरुद्ध आध्यात्मिक बळ मिळावे यासाठी सद्गुरु गाडगीळकाकांनी ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप ३ वेळा, ‘श्री गुरुदेव दत्त ।’ १ वेळ, नंतर ३ वेळा ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’आणि नंतर १ वेळ ‘ॐ नमः शिवाय ।’ असा एक आड एक जप करायला सांगितला आहे.)
२. सद्गुरु गाडगीळकाकांच्या मनात समष्टीविषयी असलेली प्रीती आणि आत्मीयता यांमुळे नामजप करतांना देवतांचे दर्शन होणे : सद्गुरु काका, हा नामजप करतांना त्या देवता डोळ्यांसमोर उभ्या रहातात. आमच्यातील भावामुळे आम्हाला हे दृश्य दिसत नाही, तर नामजप सिद्ध करतांना तुमच्या मनात समष्टीविषयी असलेली प्रीती आणि आत्मीयता यांमुळे आम्हाला देवतांचे हे दर्शन होते. मी याची प्रचीती आजही घेत आहे. तुमच्या प्रती वाटणारी कृतज्ञता मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.
– सौ. ऋतुजा नाटे, ठाणे (१०.२.२०२१)