(म्हणे) ‘अफगाणिस्तानमधून अमेरिकेला पळवून लावणार्‍या तालिबानचे कौतुक केले पाहिजे !’ – झारखंडमधील काँग्रेसचे आमदार इरफान अंसारी

  • आतंकवादी आणि धर्मांध यांचे उदात्तीकरण करणे, ही काँग्रेसवाल्यांनी ‘परंपरा’ आहे. अशा पक्षाने भारतावर सर्वाधिक काळ राज्य केले, हे संतापजनक ! – संपादक
  • ‘भारतात धर्मनिरपेक्षता हवी’, असे म्हणणार्‍या धर्मांधांना अफगाणिस्तानमध्ये मात्र शरीयतचे राज्य हवे आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक
काँग्रेसचे आमदार इरफान अंसारी

रांची (झारखंड) – अफगाणिस्तानमधून अमेरिकेला पळवून लावले; म्हणून तालिबानचे कौतुक केले पाहिजे. अमेरिका अफगाणिस्तानमध्ये किती अत्याचार करत होती, हे सर्वांना ठाऊक आहे. तेथील लोक आता खूश आहेत. अमेरिकी लोक तेथे जाऊन अफगाणी आणि तालिबानी यांच्यावर अत्याचार करत होते. आई-बहिणी आणि मुलांनाही त्रास देत होते. त्याविरोधातीलच ही लढाई आहे. तसेच जे काही (तालिबान्यांच्या विरोधात) पसरवले जात आहे ते चुकीचे आहे, असे विधान काँग्रेसचे आमदार इरफान अंसारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश यांनी अंसारी यांच्या विधानावर टीका केली आहे. ते म्हणाले की, जी संघटना महिलावरील अत्याचारासाठी कुप्रसिद्ध आहे, अशा आतंकवादी संघटनेचे अंसारी समर्थन करत आहेत. अफगाणिस्तानमधून लोक पलायन करत आहेत. अंसारी यांना भारतातही अशी परिस्थिती पहायची आहे का ? असा प्रश्नही प्रकाश यांच्याकडून विचारण्यात आला.