१. इतरांचा विचार करणे
अ. ‘पू. भाऊकाका (पू. अनंत आठवले) दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखांचे हिंदीत भाषांतर करतात. त्या वेळी मी त्यांच्या समवेत बसून टंकलेखन करते. पू. भाऊकाका मला मराठी परिच्छेदाच्या खाली तोच मराठी परिच्छेद ‘कॉपी-पेस्ट’ करायला सांगून त्यातच हिंदीत टंकलेखन करायला सांगतात. असे करण्यामागे ‘मराठी आणि हिंदी या भाषांत काही शब्द समान असल्याने ते शब्द मला पुन्हा टंकलिखित करावे लागू नयेत आणि माझा वेळ वाचावा’, असा त्यांचा हेतू असतो.
आ. भाषांतर करतांना त्यांना एखाद्या गोष्टीविषयी काही शंका असेल, तर पू. काका मला ती वाक्ये वेगळ्या रंगात टंकलिखित करायला सांगतात, जेणेकरून नंतर ही सेवा करणार्या साधकांच्या ते लक्षात येईल.
२. सतर्कता
कधी कधी टंकलेखन करण्याच्या ओघात ‘हिंदीत टंकलेखन करणार असलेला एखादा शब्द मराठी परिच्छेदातही आहे’, हे माझ्या लक्षात येत नाही. मी तो शब्द टंकलेखन करणार, तेवढ्यात पू. भाऊकाका मला सांगतात, ‘‘तो शब्द पुढे दिला आहे.’’
३. पू. काका भाषांतर करतांना ४ शब्दकोष जवळ घेऊन बसतात. त्यांनी शब्दकोषातून एखादा शब्द पाहिल्यावर ते त्या शब्दाविषयी आम्हालाही सांगतात, जेणेकरून आम्हालाही त्यातून शिकता येईल.
४. पू. काका भाषांतर करतांना परकीय शब्द न लिहिता स्वकीय शब्द लिहिण्याकडे कटाक्षाने लक्ष देतात.
५. वयोमानानुसार विस्मरण होत असले, तरी ज्ञानाचा भाग स्मरणात असणे
अलीकडे पू. भाऊकाकांना साधनेत नवीन असणार्या साधकांची नावे आठवत नाहीत. ते म्हणतात, ‘‘मला विस्मरण व्हायला लागले आहे, तरी ‘ज्ञानाचा कोणताच भाग मी विसरलो’, असे होत नाही. तो माझ्या स्मरणात असतो.’’
– सौ. समृद्धी राऊत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.८.२०२१)