‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची गुरुलीला, रामलीला, कृष्णलीला आणि विष्णुलीला’ यांसंदर्भात साधकाची झालेली विचारप्रक्रिया

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. गुरुलीला

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अखंड केलेली गुरुकृपा साधकांनी विविध माध्यमांतून अनुभवलेली आहे.

२. रामलीला

त्यांनी आदर्श रामराज्याप्रमाणे साधकांवर संस्कार करून त्यांच्या साधनेची घडी बसवली आहे.

३. कृष्णलीला

द्वापरयुगात श्रीकृष्णाने ज्याप्रमाणे लीला केल्या, तशा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या लीला सर्व साधक अनुभवत आहेत.

४. विष्णुलीला

श्री. शंकर नरुटे

शेषशायी भगवान श्रीविष्णु ज्याप्रमाणे एका ठिकाणी वास्तव्य करत असतांनाही सर्व ठिकाणी, प्रत्येक प्रसंगी भक्तांना साहाय्य करतात, त्याचप्रमाणेच परात्पर गुरु डॉक्टरांनी विश्वातील प्रत्येक साधकाच्या साधनेतील अडचणींच्या प्रसंगी त्या अडचणी सोडवल्याविषयी अनेक सूक्ष्म आणि स्थूल अनुभूती साधकांनी घेतलेल्या आहेत.

परात्पर गुरु डॉक्टरांना गुरुरूपात, तसेच श्रीराम, श्रीकृष्ण आणि श्रीविष्णु यांच्या रूपात सर्व साधकांनी अनुभवलेले आहे. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी वरील रूपांत साधकांना दर्शनही देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या त्या रूपात साधकांना दर्शन दिले. त्यामुळे आम्ही सर्व साधक जीव तृप्त (धन्य) झालो होतो. आम्ही ते क्षण हृदयात साठवून ठेवले आहेत. ‘हे गुरुदेव, ‘कधीही विसरता न येणारे साधकांच्या जीवनातील हे क्षण असेच अखंड राहू देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो.’

– श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.४.२०२०)

(वरील लिखाणात ‘लीला’ हा शब्द ‘त्या त्या देवतेची कृपा’ या अर्थाने वापरला आहे. – संकलक)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक