मुलांची नावे ठेवतांना ‘विचार कसा असावा ?’, याचे आदर्श उदाहरण !

३० ऑगस्ट २०२१ या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…

 

संत ज्ञानेश्वर

‘संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील एक उत्तम साधक होते. गुरूंच्या आज्ञेने त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. ‘गृहस्थाश्रमात राहूनही साधनामार्गावरील जीवनाचे ध्येय सतत त्यांच्या समोर राहील’, अशीच नावे त्यांनी त्यांच्या मुलांची ठेवली. त्यांनी ठेवलेल्या नावांमधून पुढील बोध होतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘निवृत्ती’नाथ : संसारातून निवृत्त झालो, मायेची आसक्ती न्यून केली किंवा त्याग केला की, साधना होऊ लागते.

‘ज्ञान’देव : निवृत्त झालेल्या साधकाला खरे ‘ज्ञान’ होऊ लागते.

‘सोपान’देव : ज्ञान झालेला साधक ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करू लागतो.

‘मुक्ता’बाई : असा ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करणारा साधक, त्याची साधना फळास आल्यावर मुक्त होतो.

‘पूर्वीच्या काळी लोक प्रत्येक गोष्टीचा किती बारकाईने विचार करत होते ?’, हे लक्षात येते !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले