केरळमध्ये मुसलमान दिग्दर्शकाकडून बनवण्यात येणार्‍या ‘येशू : नॉट फ्रॉम द बायबल’ चित्रपटाच्या विरोधात ख्रिस्ती ‘महंमद : द पॉक्सो क्रिमिनल’ लघुपट बनवणार !

केरळ चित्रपट जगतात इस्लामी कट्टरतावादी नियंत्रित करत असल्याचा ख्रिस्ती माजी आमदाराचा आरोप !

हिंदूंना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डोस पाजणारे अशा प्रकरणात गप्प रहातात, हे लक्षात घ्या ! – संपादक  

केरळमध्ये ख्रिस्तीप्रेमी आणि मुसलमानप्रेमी साम्यवादी आघाडी सरकार आता कुणाची बाजू घेणार आणि कुणावर कारवाई करणार, हे पहावे लागले ! – संपादक

येशू : नॉट फ्रॉम द बायबल आणि महंमद : द पॉक्सो क्रिमिनलची जाहिरात

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील चित्रपट दिग्दर्शक नादीर शाह यांनी ‘येशू : नॉट फ्रॉम द बायबल’ (येशू : बायबलमधील नसणारा) हा चित्रपट बनवण्यास प्रारंभ केला आहे. या चित्रपटाच्या नावामध्ये ‘येशू’ असल्यामुळे राज्यातील ख्रिस्ती संतप्त झाले आहेत; मात्र नादीर शाह यांनी दावा केला आहे की, या चित्रपटामध्ये येशूविषयी काहीही नाही. तरीही ‘ख्रिस्ती ऐकण्यास सिद्ध नसल्याने चित्रपटाच्या नावातील ‘नॉट फ्रॉम बायबल’ हे वाक्य काढून टाकण्यात येईल,’ असे त्यांनी म्हटले आहे.

१. माजी आमदार पी.सी. जॉर्ज यांनी आरोप केला की, केरळ चित्रपट जगतात इस्लामी कट्टरतावाद्यांकडून नियंत्रित केली जात आहे.

२. नादीर शाह यांनी फेसबूकवर पोस्ट करून सांगितले की, चित्रपटाशी येशूचा काहीच संबंध नाही. मी येशूचा सन्मान करतो. या चित्रपटात केवळ पात्राचे नाव ‘येशू’ आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर जर लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या, तर मी कोणतीही शिक्षा भोगण्यास सिद्ध आहे.

ख्रिस्त्यांकडून ‘महंमद : द पॉक्सो क्रिमिनल’ लुघपट बनवण्याची घोषणा

नादीर शाह यांच्या विरोधात आता ‘ख्रिश्‍चियन असोसिएशन अँड अलायंस फॉर सोशल अ‍ॅक्शन’ (सामाजिक कार्यासाठी कार्यरत ख्रिस्ती संघटनांची युती) नावाच्या फेसबूक गटाने लघुपट काढण्याचे घोषित केले आहे आणि त्याचे नाव ‘महंमद : द पोक्सो क्रिमिनल’ (अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांवर ‘पोक्सो’ कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात येतो. त्या अनुषंगाने ‘पोक्सो’ गुन्हेगार’ असा शब्दप्रयोग येथे केला आहे.) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १९ नोव्हेंबर या दिवशी हा लघुपट प्रदर्शित करण्याचीही घोषणा केली आहे. हा लघुपट आसामच्या दिब्रूगड येथे महंमद नावाच्या बांगलादेशी घुसखोराने एका ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार  केल्याच्या घटनेवर आधारित आहे.