‘आप’ पक्षाच्या नगरसेवकाच्या भावाला बलात्काराच्या प्रकरणी अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

सूरत (गुजरात) – एका घटस्फोटित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी येथील आम आदमी पक्षाचे नगरसेवक धमेंद्र वावलिया यांचा भाऊ मेहुल यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पीडितेला वाहन परवाना मिळवून देण्याच्या बहाण्याने नवसारी येथे नेले. तेथे जात असतांना आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. या घटनेनंतर भाजपने पीडितेला न्याय देण्यासाठी आम आदमी पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी धर्मेद्र वावलिया म्हणाले की, मेहुल त्यांचा भाऊ आहे; परंतु अनेक वर्षांपासून त्याच्याशी त्यांचा संपर्क नाही. त्याने गुन्हा केला असल्यास त्याला कठोर शिक्षा देऊ शकता. (अशी जर-तरची भाषा करणारे लोकप्रतिनिधी कायद्याचे राज्य कधी देतील का ? – संपादक)