रामनाथी आश्रमातील एक ‘सदाफुली’ ।

श्री. भानु पुराणिक

सदैव फुलत असे, ती सदाफुली ।
तिच्याकडे पाहुनी आपले मनही उमले त्या फुलापरी ।। १ ।।

अशीच एक आहे, रामनाथी आश्रमातील ‘सदाफुली’ ।
निर्मळ मन तिचे अन् निखळ खळखळते हास्य ।। २ ।।

सहजता तिची आपल्यातही सहज भाव निर्माण करी ।
यांमुळे आपणही वहातो, तिच्या निखळ हास्याच्या प्रवाही ।। ३ ।।

‘वर्धिनी’ (टीप) असे नाव तिचे ।
नावापरी सर्वांच्या आनंदात वाढ करीतसे ।। ४ ।।

टीप – रामनाथी (गोवा) आश्रमातील सौ. वर्धिनी वासुदेव गोरल

– श्री. भानु श्रीराम पुराणिक (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक