पुण्यात अमली पदार्थांची विक्री करणार्‍या तिघांना अटक !

कोंढवा पोलीस ठाण्यात एन्.डी.पी.एस्. कायद्यान्वये गुन्हा नोंद !

अमली पदार्थांमुळे तरुणाई व्यसनाच्या गर्तेत जात आहे, हे लक्षात घेऊन अमली पदार्थांची विक्री करणार्‍यांवर केवळ गुन्हा नोंद करून न थांबता त्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

पुणे – शहरात चरस, गांजा आणि चरस तेल या अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक करून त्यांच्याकडून ३ लाख २३ सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ शासनाधीन केले आहेत. नासिर शेख, पुनीत काद्यान आणि शरद नायर अशी अटक केलेल्यांची नावे असून न्यायालयाने या तिघांना २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत दिली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून त्यांना कह्यात घेतले. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात एन्.डी.पी.एस्. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.